शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पालकमंत्र्यांनी रखडलेल्या कामांना गती द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 10:59 PM

सातत्याने सुरू आहे चालढकल

ठळक मुद्दे चौपदरीकरण, उड्डाणपूलाच्या कामांना केव्हा सुरुवात होणार? समांतर रस्त्यांच्या डीपीआरला मंजुरीची प्रतीक्षा

जळगाव : दररोज निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण, गेल्या तीन वर्षांपासून ‘डीपीआर’ भोवतीच फिरणारा समांतर रस्त्याचा प्रश्न, शिवाजीनगर, पिंप्राळा व सूरत रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वत: लक्ष घालून मार्गी लावण्याची जळगाकरांना अपेक्षा आहे.गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रश्न रखडल्याने जळगावकर त्रस्त आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठरविले तर हे सर्व विषय ते मार्गी लावू शकतात, अशी शहरवासीयांची भावना आहे. सोमवारी जिल्हा दौºयावर ते येत असून त्यांच्या उपस्थितीत टंचाई, खरीप आढावा, गौणखनिज आढावा बैठका आहेत. त्यांनी अधिकाºयांना सूचना देवून तसेच शासनस्तरावर प्रयत्न करुन रखडलेले प्रश्न मार्गी लावून शहरवासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.समांतर रस्त्यांच्या डीपीआरला मंजुरीची प्रतीक्षाशहरातील निरपराध नागरिकांचा बळी घेणाºया महामार्गाच्या समांतर रस्त्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. समांतर रस्त्यांसाठी शासनाकडून निधी जाहीर होऊनही दरवेळा डीपीआरच्या प्रक्रियेत अडकून नंतर बदल झाल्याने हा विषय रखडला आहे. यापूर्वी ४४४ कोटींचा डीपीआर, त्यानंतर १०० कोटींचा डीपीआर, त्यानंतर १२५ कोटींचा निधी मंजूर होऊन प्रत्यक्षा १३९ कोटींचा डीपीआर सादर होणे अशा रितीने सातत्याने घोळ सुरू आहेत. आता नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे महिनाभरापूर्वी झालेल्या बैठकीत १०० ऐवजी १२५ कोटींचा डीपीआर बनविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ‘नही’ने १३९ कोटींचा डीपीआर वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यामुळे आता त्याच्या मंजुरीत अडथळे यायला नकोत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच २३ मार्च रोजीच हा डीपीआर मंजुरीसाठी पाठविण्यात आला असताना व डीपीआर मंजुरीची केवळ औपचारीकता आहे. विषय आधीच मंजूर असल्याचे सांगितले जात असताना अद्यापही डीपीआरला मंजुरी मिळालेली नाही. खासदार ए.टी. पाटील यांना विचारणा केली असता त्यांना या विषयाची सद्यस्थिती माहिती नसल्याचे मात्र दोन दिवसात अधिकाºयांची बैठक घेतो, असे सांगितले. त्यामुळे पालकमंत्र्यांनी स्वत:च या विषयात लक्ष घालून हा समांतर रस्त्यांचा गंभीर विषय तातडीने मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.शेतकरी नवीन पीककर्जापासून वंचितकर्जमाफी रखडल्याने शेतकºयांना नवीन हंगामासाठी पीककर्ज वाटप सुरू होऊनी त्यापासून वंचित रहावे लागत आहे. कारण थकबाकीदार शेतकºयांना जिल्हा बँक कर्ज देऊ शकत नाही. आणि शासनाची कर्जमाफी योजना रखडल्याने शेतकरी कर्जमाफीस पात्र होऊन त्यांचे कर्जखाते अद्यापही ‘नील’ झालेले नाहीत.तरसोद-चिखलीच्या चौपदरीकरण रखडलेराष्टÑीय महामार्ग क्र.६च्या धुळे ते अमरावती दरम्यान तीन टप्प्यात करावयाच्या चौपदरीकरणासाठी २०१२ पासून प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यात सातत्याने वेगवेगळे अडथळे येत गेल्याने हे काम अर्धवटच आहे.महाराष्टÑातील अमरावती ते धुळे या दरम्यानच्या महामार्गापैकी जळगाव जिल्ह्यात चिखली ते तरसोद व तरसोद ते फागणे असे दोन टप्पे करून निविदा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी तरसोद ते फागणे या टप्प्याचे काम मिळालेल्या मक्तेदाराने कामाला वेगाने सुरुवात केली आहे. मात्र तरसोद ते चिखली या टप्प्याच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. संबंधीत मक्तेदार कंपनीने गुजराथच्या ‘वेल स्पुन’ कंपनीला हे काम सोपविले असून ही कंपनी वर्षभरात हे काम पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे हे काम अखेर मार्गी लागले, अशी आशा जळगावकरांना निर्माण झाली होती. मात्र या कंपनीने देखील अद्याप हे काम सुरू केलेले नाही. त्यामुळे हे काम कधी सुरू होणार? असा सवाल निर्माण झाला आहे.विमानसेवेचा सावळा गोंधळजळगाव-मुंबई विमानसेवेत सातत्याने व्यत्यय येत असून मध्यंतरी तर काही दिवस ही विमानसेवा बंदच होती. आता २२ पासून पुन्हा ही सेवा सुरू होत असल्याचे सांगितले जात असून बुकींगही सुरू झाले आहे. मात्र पुन्हा ही सेवा बंद पडू नये, अशीच जळगावकरांची इच्छा आहे. शहराच्या विकासासाठी विमानसेवा महत्वाची असल्याने पालकमंत्र्यांनी या विषयातही लक्ष घालण्याची गरज आहे. जळगाव-पुणे सेवाही सुरू करण्याचे सांगितले जात होते. मात्र अद्यापही या सेवेला मुहूर्त लाभलेला नाही. वास्तविक जळगाव-पुणे विमानसेवेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू शकतो. तसेच या दोन्ही विमानतळांच्या टाईमस्लॉटचीही मुंबई इतकी अडचण नाही. असे असताना ही विमानसेवा तातडीने सुरू होणे अपेक्षित आहे. या विषयातही पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.