जळगाव : राज्याचे महसूल, बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांधकाम व्यावसायिक, शहरातील व्यापारी वर्गाची भेट घेऊन चर्चा केली मात्र या बैठकांना आमदार सुरेश भोळे व महापौर सीमा भोळे हे शहराशी संबंधीत राजकीय पदाधिकारी नसताना घेतल्या गेलेल्या बैठकीचे फलीत काय? असा प्रश्न आता केला जात आहे. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेदेखील जिल्ह्यातच होते.पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे बुधवारी १ मे रोजी दिवसभर शहरात होते. आचारसंहिता असल्यामुळे त्यांनी शहरातील एका खाजगी हॉटेलमध्येच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. यात जिल्हा व्यापारी महामंडळाचे पदाधिकारी, क्रेडाई पदाधिकारी, आर्किटेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी, जिंदाचे पदाधिकारी व सिव्हील इंजिनिअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांनी बैठक घेतली.व्यावसायिक, व्यापारी वर्गास शहरात येणाºया विविध अडचणींवर पालकमंत्र्यांनी संवाद साधला. उद्योजकांची यापूर्वीही त्यांनी बैठक घेतली होती.विषय शहराचे पण आमदार आलेच नाहीतजिल्हा व्यापारी महामंडळाचे पदाधिकारी, क्रेडाई पदाधिकारी, आर्किटेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी, जिंदाचे पदाधिकारी यांचे बैठकीतील विषय हे काही राज्य तर काही शहर पातळीवरचे व मनपा पातळीवरचे होते.मात्र या बैठकांना शहराचे आमदार सुरेश भोळे किंवा महापौर सिमा भोळे या दोघांपैकी कोणीही नव्हते. त्यामुळे बैठक म्हणजे केवळ फार्स तर नव्हे असे नंतर उपस्थितांकडून बोलले जात होते.जलसंपदा मंत्री जिल्ह्यातजलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सकाळपासून जिल्ह्यात होते. सकाळी त्यांचे आगमन झाले त्यानंतर ते जामनेरला गेले. दिवसभर ते जामनेर येथेच होते.सायंकाळी ते जळगावी आले व त्यानंतर आमदार भोळे व ते विमानाने मुंबईस रवाना झाले. मात्र त्यांनीही पालकमंत्र्यांची दिवसभरात भेट न घेतल्याने पक्षातील पदाधिकाºयांच्या भुवया उंचावल्या होत्या व याबाबत चर्चाही सुरू होत्या.पालकमंत्री तेच व विषयही तेचउद्योजकांची यापूर्वी एमआयडीसीत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्या बैठकीत एफएसआय, एमआयडीसीचा दर्जा, वीजेचे दर असे काही विषय उद्योजकांनी मांडले होते. यावेळी तेच विषय उद्योजकांनी मांडल्याचे समजते. मात्र या बैठकीलाही आमदार भोळे नव्हते.प्रश्नांकडे दुर्लक्षचउद्योजकांच्या बैठकीतील चर्चेत आमदार नसल्याबाबत जिंदाचे प्रभारी अध्यक्ष किरण राणे यांनीही नाराजी व्यक्त केली. गेल्या बैठकीत होते तेच विषय यावेळी चर्चेत आले पण ते सुटले नाही केवळ मुंबईत बैठकीचे आश्वासन मिळाल्याचे ते म्हणाले. आमदारांनी तर उद्योजकांची एकदाही बैठक घेतली नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.पालकमंत्री शहरात होते पण आपले दिवसभरात काही नियोजित कार्यक्रम असल्यामुळे आपण त्यांच्या बैठकांना जाऊ शकलो नाही.- सुरेश भोळे, आमदार.
पालकमंत्र्यांची बैठक आमदार, महापौरांविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:36 PM