प्रशिक्षण पूर्ण करून कामावर घेण्याची मागणी
जळगाव : राज्य परिवहन महामंडळात सरळ सेवा भरती अंतर्गंत भरती झालेल्या उमेदवारांचे कोरोनामुळे प्रशिक्षण थांबविण्यात आले होते. मात्र, आता महामंडळाची सेवा पुर्ववत सुरू झाल्यानंतर भरती झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण पुर्ण करून, पुन्हा कामावर घेण्याची मागणी चेतन सोनवणे, फिरोज सय्यद व राहुल पाटील यांनी परिवहन मंत्र्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कालभैरव जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
जळगाव : सिंधी कॉलनी जवळील नाथवाडा येथील श्री काळ भैरवनाथ मंदिरात ६ नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंतीनिमित्त सकाळी ६ वाजता अभिषेक, त्यानंतर आठवाजता आरती, ९ वा होमहवन व महाआरती व दुपारी बारा वाजता महाप्रसाद होणार आहे. तसेच ४ वाजता पालखी व रात्री दहा वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन
जळगाव : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांचे `वैज्ञानिक विचार व दृष्टीकोन या विषयावर प्रा. डॉ. प्रकाश कांबळे यांचे देवेंद्र नगर येेथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमाला येणाऱ्या नागिकांनी कोरोनाच्या पार्शभूमीवर योग्य ती खबरदारी बाळण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महिला महाविद्यालयात व्याख्यान उत्साहात
जळगाव : येथील कला, वाणिज्य, गृहविज्ञान महिला महाविद्यालयात ग्लोबल टिचर पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले यांच्या कार्याची माहिती देण्यासाठी प्रा. डॉ. प्रकाश कांबळे यांचे व्याख्यान उत्साहात पार पडले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे यांनी रणजितसिंह यांच्यापासून प्रेरणा घेऊन, प्रत्येक शिक्षकाने अध्यन तंत्रज्ञानात बदल करण्याचे आवाहन केले.