जळगाव : जिल्हा एसटी कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सोमवारी मतमोजणी झाली. या निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ प्रस्तुत परिवर्तन पॅनलले या निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवित सर्व जागांवर विजय मिळविला. तीन मात्तबर संघटना मिळुन एकत्र आलेल्या एसटी कर्मचारी विकास आघाडीचा धुव्वा उडाला आहे. या विजया नंतर परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांनी जळगाव आगारात फटाके फोडून व गुलाल उधळत मोठा जल्लोष केला.
एसटी पतसंस्थेच्या निवडणुकीत १२ मार्च रोजी ९१ टक्के मतदान झाले होते. १७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महाराष्ट्र एसटी वर्कस कॉंग्रेस इंटक संघटना, एसटी कामगार सेना व महाराष्ट्र एसटी कामगार संघटना मिळुन एकत्र आलेल्या कर्मचारी विकास आघाडी व ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी कर्मचारी कष्टकरी जनसंघ प्रस्तुत परिवर्तन पॅनल यांच्यात ही लढत झाली होती. तीन बलाढ्य कामगार संघटना व ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या परिवर्तन पॅनल विरोधात एकत्र आल्याने, या निवडणुकीकडे सर्व एसटी कामगारांचे लक्ष वेधले होते.
तीन संघटना एकत्र येऊन एकही जागा राखता आली नाही..
एसटी कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीतत ॲड. गुणरत्न सदावर्तेंचे परिवर्तन पॅनलही उभे राहिल्यामुळे, मतांचे विभाजन होऊ नये, तसेच या संघटनेला रोखण्यासाठी इंटक संघटना, एसटी कामगार सेना व महाराष्ट्र एसटी कामगार संघटना या तीन मातब्बर संघटना एकत्र आल्या होत्या. या तिन्ही संघटनांनी कर्मचारी विकास आघाडी स्थापन करून निवडणुक लढविली होती. मात्र, मतदारांनी सदावर्तेच्या पॅनलला मतांचे भरघोस दान दिल्याने, या निवडणुकीत या तिन्ही मातब्बर संघटनांना एकही जागा राखता आली नाही.
परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार व मिळालेली मते (कंसात)- पंडित वामन पाटील(मिळालेली मते १४५४), समाधान संभाजी पाटील(१४४६), निंबा पद्मसिंग राजपुत(१४४६), जितेंद्र सोमनाथ पाटील(१४४०), देवेंद्र पंडित ठाकरे(१४३८), रामराव डोंगरसिंग राठोड (१४३०), डिंगबर सिताराम सोनवणे(१४१४), नरेंद्रकुमार भगवान रायसिंग(१४१३), राजेश मधुकर ठाकुर(१३९९), प्रविण साहेबराव मिस्तरी(१३९७), विनोद बनगर गवळे(१३६६), दीपक रघुनाथ नागपुरे(१३४५), चारूलत्ता ज्ञानेश्वर घरटे(१४८७), शुभांगिनी बळीराम सोनवणे(१४०१), अमोल सुधाकर सुरवडकर(१५१४), नाना पुडंलिक बाविस्कर(१५७३), अमिन इतबार तडवी(१४६०).
कर्मचारी विकास आघाडीचे पराभुत उमेदवार व त्यांना मिळालेली मते(कंसात)
प्रकाश विश्वास भोई (मिळालेली मते १००६), ज्ञानेश्वर मन्साराम देवरे(१५१), मनोज देविदास गवळी(९४६), सुनिल ताराचंद जाधव(९४३), गणेश राजेंद्र नाथजोगी(९८५), भुषण रजनीकांत पाराशरे(९१७), अमिन सलिम पटेल(९०६), दिपक अरविंद पाटील(१००३), गोपाळ लोटन पाटील (९७३), सरला राजेंद्र पाटील(९९०), विनोद साहेबराव पाटील(९६७), सोपान सोमा सपकाळे(९३०), प्रमिला अनिल दीक्षित(१०१५), शितल भाऊसाहेब पाटील(९७८), प्रकाश पुरूषोत्तम राऊते(११०६), कांतीलाल छगनलाल कडारे(१०५१), कैलास रघुनाथ सोनवणे(१०४०)