जळगाव- रेल्वेस्थानक परिसरात दोन गटात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एकाने थेट पिस्तूल रोखल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. या प्रकरणात पिस्तोल रोखणारा शेख अक्रम शेख कय्युम (वय-२६, रा़ भारत नगर) याला शुक्रवारी शहर पोलिसांनी गेंदालाल मिल परिसरातून अटक केली असून त्याच्याजवळील एअर गन सुध्दा जप्त केली आहे.बुधवारी रात्री १२ वाजता रेल्वेस्थानक परिसरात दोन गटात क्षुल्लक कारणावरून दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली होती. यातील एकाने चक्क धत्तींग करण्याच्या नादात कमरेला लावलेली पिस्तोल (एअरगन) ही एकावर रोखली होती. त्यामुळे धावपळ उडाली होती. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह शहर पोलिसांनी रेल्वेस्थानकाकडे धाव घेतली. मात्र, पोलीस पोहचण्याआधीच दोन्ही गट पसार झाले होते. नंतर गेंदालालमिल परिसरात कोबिंग आॅपरेशन राबविण्यात आले.गेंदालाल मिल परिसरातून अटकबुधवारी रात्री घटना घडल्यानंतर शहर पोलीस पिस्तोल रोखणाऱ्या तरूणाच्या शोधार्थ होते. अखेर त्या तरूणाचे नाव शेख अक्रम श्ेख कय्युम असे असून तो गेंदालाल मिल परिसरात असल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांना मिळाली़. क्षणाचा विलंब न करता पोलिसांनी गेंदालाल मिलमध्ये जाऊन त्याला अटक केली. तसेच अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एअरगन मिळून आली. ती एअगनसह त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
एअर गनसह 'त्या' तरूणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:18 PM