धुळे : निवडणूक जाहीर होताच अनेक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रचाराची जबाबदारी दिली जाते. मात्र आता याला अंकूश लावण्यात आलेला आहे. लोकसभा निवडणुकीत शिक्षकांना कोणत्याही राजकीय उमेदवाराचा प्रचार करता येणार नाही. त्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लेखी हमीपत्रे द्यावे लागतील अशा सूचना माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाºयांनी संस्थाचालक व मुख्याध्यापकांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.लोकसभा निवडणूक जाहीर झालेली असून, आदर्श आचारसंहितेचे पालन राजकीय पक्षांसह सर्वच अराजकीय व्यक्तींनाही करावे लागते. निवडणूक म्हटली म्हणजे काही शैक्षणिक संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचा उपयोग उमेदवाराच्या प्रचारासाठी केला जातो. यात राजकीय पक्षाशी निगडीत असलेले काही शिक्षक कर्मचारी आपल्या नेत्याच्या प्रचारासाठी जीवाचे रान करीत असतात. मात्र आता निवडणूक आयोगाने यावर आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे आता माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाºयांना फक्त निवडणूक आयोगाने नेमून दिलेले निवडणुकीचे काम करता येणार आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयाचा राजकीय प्रचारासाठी वापर होणार नाही याची जबाबदारी मुख्याध्यापक व प्राचार्यावर सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना लेखी हमीपत्र द्यावे लागणार आहे. या हमी पत्रात आचारसंहिता पालनाबाबत पूर्ण जाणीव असल्याबाबतची लेखी ग्वाही द्यावी लागणार आहे...तर कारवाई करणारज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडून हमीपत्रे वेळेत दिली जाणार नाहीत, त्या शाळांचे फेब्रुवारी पेड इन मार्चचे वेतन अनुदान स्थगित करण्यात येईल असा इशारा शिक्षणाधिकाºयांनी दिला आहे. तसेच कर्मचाºयांचा गैरवापर झाल्यास शिक्षकासह मुख्याध्यापक, प्राचार्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे पत्रात नमूद केलेले आहे.
गुरूजींना करता येणार नाही प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:19 AM
शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र
ठळक मुद्देद्यावे लागणार लेखी हमीपत्र