आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.४-शाळास्तरावर शिक्षकांना देण्यात आलेली आॅनलाईन कामे, बदली प्रक्रियेतील जाचक नियमासह विविध शासननिर्णयाविरोधात शनिवारी जिल्ह्यातील सुमारे 4 हजार जिल्हापरिषदेच्याप्राथमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून शासनाची झोप उडवून दिली. शिस्तबध्दरित्यावकोणत्याही घोषणा न देता काढलेल्या या विराट मोर्चाव्दारे शिक्षकांवर शासनाकडून लादण्यात आलेल्या जाचक अटींविरोधात जिल्'ातील २४ शिक्षक संघटना पहिल्यांदाच एकत्र आल्या.4 शिक्षिकांच्या पंचमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.
शिक्षक बदली विषयक २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या शिक्षक बदली विषयक शासन निर्णयात अन्यायकारक बाबी बदलण्यात याव्यात, शिक्षकांवर थोपण्यात आलेल्या आॅनलाईन कामांसाठी शाळास्तरावर डेटा आॅपरेटरची नियुक्ती करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी ४ नोव्हेंबर रोजी राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेकडून घेण्यात आला होता. त्यांच्या निर्णयाला राज्यभरातील शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिल्यानंतर शनिवारी जळगावात डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानापासून दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्'ातील सुमारे ५ हजार शिक्षक सहभागी झाले.
मोर्चाच्या अग्रभागी महिला शिक्षिकामोर्चाला सुरुवात करण्यात आधी आॅनलाईन जाचाला कंटाळून आत्महत्या करणारे चाळीसगाव तालुक्यातील देशमुखवाडी जि.प.शाळेतील शिक्षक आबासाहेब चौधरी (रा.पिंपळगावम्हाळसा)यांना श्रध्दांजली देण्यात आली. मोर्चाच्या अग्रभागी महिला शिक्षिका, त्यानंतर ज्येष्ठ शिक्षक, तरुण शिक्षक व सर्वात शेवटी जिल्हा शिक्षक समन्वयक समितीचे सदस्य अशाप्रकारे मोर्चाची रचना करण्यात आली. दुपारी १.३० वाजता श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानातून मोर्चाला सुरुवात झाली तर दुपारी २.४० वाजता हामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. तब्बल एक तास चाललेल्या या मोर्चात शिक्षकांनी शिस्तीचे दर्शन घडविले. शिक्षकांनी टोप्या घालून त्यावर आपल्या मागण्या लिहिलेल्या होत्या. तर विविध फलकांवर देण्यात आलेल्या घोषणांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
महिलांच्या पंचमंडळाने दिले निवेदनजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा समारोप झाला. यावेळी पाकीजा पटेल, संगीता मगर, विद्यादेवी पाटील, छाया सोनवणे, अफशातरन्नुम खान या महिला शिक्षिकांच्या पंचमंडळाने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन दिले. यावेळी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे देखील उपस्थित होते.
अशा होत्या मागण्या १. शिक्षकांकडे दिलेली आॅनलाईनची कामे बंद करा व केंद्रस्तरावर डेटा आॅपरेटरची नेमणूक करण्यात यावी.२. २७ फेब्रुवारी २०१७ रोजीचा शिक्षक बदलीविषयक शासन निर्णयातील अन्यायकारक बाबींची दुरुस्ती करण्यात यावी.३. २३ आॅक्टोबर २०१७ रोजीच्या निवड-वरिष्ठ श्रेणीबाबतच्या अन्यायकारक अटी रद्द करा.४ . १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करा.५.संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण होण्याची मुदतीत वाढ देण्यात यावी.६.शालेय पोषण आहारासह अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करा व शिक्षकांना फक्त शिकवू द्या.