जळगाव : नवग्रहांमध्ये प्रमुख ग्रह म्हणून ओळख असलेला बृहस्पती अर्थात गुरू ग्रहाचा २१ एप्रिल रोजी उत्तररात्रीनंतर म्हणजेच शनिवार, २२ एप्रिल रोजी पहाटे ५:१५ वाजता मेष राशीत प्रवेश होत आहे. त्याचा पुण्यकाळ शनिवारी पहाटे ३ वाजून २४ मिनिटांपासून तर सकाळी सात वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे. गुरूपालटमुळे मकर, कन्या व वृषभ या राशींना अनुक्रमे चौथा, आठवा, बारावा अनिष्ट गुरू येत असल्याने आगामी एक वर्ष त्रासदायक जाणार आहे.
एका राशीत तेरा महिने गुरू असतो. उपनयन, विवाह यासह अनेक कार्यासाठी गुरूबल आवश्यक असते. २२ एप्रिल २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत गुरू मेष राशीत भ्रमण करणार आहे. १ मे २०२४ रोजी गुरू वृषभ राशीत प्रवेश करील.
देवांचा गुरू बृहस्पतीदेखील आपली स्थिती बदलणार आहे. गुरू बृहस्पतीच्या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्व १२ राशींवर होईल. गुरू बृहस्पती हा धनू आणि मीन राशीचा स्वामी आहे. कर्क ही त्यांची उच्च राशी मानली जाते आणि मकर ही त्यांची नीच राशी मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार २२ एप्रिल २०२३ रोजी पहाटे गुरू स्वतःची मीन राशी सोडून आपल्या मित्र राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करील. गुरू बृहस्पती अस्ताच्या अवस्थेत मीन राशीत जाईल.
मेष राशीला पहिला, वृषभला बारावा, मिथुनला अकरावा, कर्क राशीला दहावा, सिंहेला नववा, कन्येला आठवा, तुला राशीला सातवा, वृश्चिकला सहावा, धनूला पाचवा, मकरला चौथा, कुंभ राशीला तिसरा, तर मीन राशीला दुसरा गुरू येत आहे. गुरू सुवर्णपादाने आल्यास त्याचे फल जरी चिंता असले तरी सुवर्णपदी गुरू शुभ आहे. पीडा परिहारार्थ पुण्यकाळात गुरूचे जप, उपासना, दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.
नवग्रहांमध्ये प्रमुख ग्रह म्हणून ओळख असलेला बृहस्पती अर्थात गुरू ग्रहाचा २१ एप्रिल रोजी उत्तररात्रीनंतर म्हणजेच शनिवार, २२ एप्रिल रोजी पहाटे ५:१५ वाजता मेष राशीत प्रवेश होत आहे. त्याचा पुण्यकाळ शनिवारी पहाटे ३ वाजून २४ मिनिटांपासून तर सकाळी सात वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे.-प्रसाद महाराज धर्माधिकारी, नशिराबाद.
राशीनिहाय गुरू बदलाचे फल
जन्मराशी- पाद- फलवृषभ, कर्क, धनू- सुवर्ण - चिंता
मेष, कन्या, मकर- रौप्य - शुभ
सिंह, वृश्चिक, मीन - ताम्र - श्रीप्राप्ती
मिथुन, तुला, कुंभ - लोह - कष्ट