जळगाव : स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या त्रयस्थ समितीच्या पाहणीनंतर जळगाव शहर हगणदरीमुक्त घोषीत करण्यात आले. असे असले तरी शहरातील अनेक भागांमध्ये स्थानिक रहिवासी हे उघड्यावरच शौच करत असल्याचे ‘लोकमत’ने मंगळवारी सकाळी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे हगणदरीमुक्ती केवळ कागदावरच असल्याचे म्हटल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही.केंद्र सरकारने नेमलेल्या क्युसीआय या त्रयस्थ संस्थेने ८ आॅगस्ट रोजी शहरातील ९ ठिकाणांवर प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर २७ आॅगस्ट रोजी केंद्र सरकारने जळगाव शहर ‘हगणदरी मुक्त’ म्हणून घोषीत केले. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ च्या चमुने मंगळवार, २८ आॅगस्ट रोजी हगणदरी मुक्तीच्या दाव्याबाबत शहरातील काही भागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान शहरातील बऱ्याच भागांमध्ये नागरिक सार्वजनिक किंवा वैयक्तिक शौचालयांचा वापर न करता उघड्यावरच शौच करत असल्याचे आढळून आले.आयटीआय समोरील जागेवर व्यावसायिकांनींच बनवली हगदणदारीएकलव्य क्रीडा संकुलासमोरील जागेचा वापर शौचालयासाठी सर्रास होत आहे. शासकीय आयटीआयच्या लगतच परराज्यातून आलेल्या विविध लहान-मोठ्या व्यावसायिकांची गेल्या काही महिन्यांपासून येथे दुकाने थाटली आहेत. या व्यावसायिकांचे संपूर्ण कुटुंब याच ठिकाणी वास्तव्य करीत आहेत. या परिसरात कुठेही सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे त्यांच्याकडून एकलव्य क्रीडा संकुलासमोरील जागेचा शौचसाठी वापर होत असल्याने लोकमत प्रतिनिधीने सकाळी साडेसातच्या सुमारास पाहणी केली असता दिसून आले. एक व्यावसायिक हातात प्लास्टीकची बाटली घेऊन जाताना दिसून आला. या जागेच्या पाठीमागेच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे.लक्ष्मी नगर, लाकुड पेठ, शिवाजी नगर भागात उघड्यावरच शौचकानळदा रस्त्यालगत असलेल्या लक्ष्मी नगर, लाकुड पेठ, शिवाजी नगर या भागात उघड्यावरच शौच करीत होते. विशेष म्हणजे ८ आॅगस्ट रोजी शहरात आलेल्या समितीतील सदस्यांनी पाहणी केलेल्या शिवाजी नगर भागात देखील अनेक ठिकाणी उघड्यावरच शौच करताना दिसून आले होते. रेल्वे स्टेशन समोरील कानळद्याकडे जाणाºया मुख्य रस्त्यालगतच उघड्यावर शौच केली जाते.या भागांची केली पाहणी‘लोकमत’ च्या चमुने शहरातील लक्ष्मी नगर, पिंप्राळा-हुडको, तांबापुरा, शिवाजी नगर, लाकुड पेठ,कांचन नगर, एकलव्य क्रिडा संकुल परिसर, डी-मार्ट परिसर, शाहू नगरातील जळकी मील या भागांची पाहणी करण्यात आली. सकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले.राजीव गांधीनगरातही घाणराजीवगांधी नगरातील काही झोपडपट्टीधारकांच्या घरात किंवा त्या परिसरात मनपाचे सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे येथील रहिवासी जवळच असलेल्या मोकळ्या जागेत शौचालयात जाताना दिसले़तांबापूर परिसरातही जैसे-थे परिस्थतीतांबापुरा परिसरातील हगणदरीची पाहणी केली असता, या ठिकाणीदेखील बिनधास्तपणे येथील सार्वजनिक जागेवर नागरिक शौचालयाला जाताना दिसून आले. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत नागरिक हातात प्लास्टीकच्या बाटल्या घेऊन, एकमागून एक जातांना दिसून आले.पिंप्राळा-हुडको परिसरात उघड्यावरच शौचपिंप्राळा तसेच पिंप्राळा-हुडको, हरिविठ्ठल, खंडेरावनगर व गिरणा पंपींग रस्त्यावर मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पाहणी करण्यात आली़ या पाहणीत हगणदरीमुक्त अभियानाचा अक्षरश: फज्जा उडालेला दिसून आला़ पिंप्राळा-हुडको या ठिकाणी शेताजवळच परिसरातील पुरूष हे शौचालयासाठी बसेलेले होते़दुर्गंधीमुळे रस्त्यावरून जाणे मुश्किलरस्त्यावरच नागरिक शौचास बसत असल्यामुळे गिरणा पंपींग रस्ता, खंडेरावनगर तसेच पिंप्राळा-हुडको शेत परिसरातील रस्त्यावरून पायी किंवा दुचाकीवरुन जाताना दुर्गंधीला समोरे जावे लागत आहे. या ठिकाणी सफाईच होत नाही़ या भागात उघड्यावरच शौचास बसतात. पावसाळ्यात तर या भागात अधिकच दुर्गंधी पसरली आहे.पिंप्राळा-हुडको, खंडेरावनगर तसेच हरिविठ्ठल परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे़ त्यामुळे घरी शौचालय नसल्यामुळे अनेक वर्षांपासून झोपडपट्टीतील रहिवासी सार्वजनिक जागेचाच शौचालयासाठी वापर करत आहेत़ खंडेरावनगराकडून गिरणा पंपींगकडे जाणाºया कच्च्या रस्त्यावर काही नागरिक शौचालयाला जाताना दिसून आले़ या परिसरातील सार्वजनिक शौचालयांची दुर्दक्षा झाल्याने उघड्यावर जातात.मानसिकतेत बदल करणे व शौचालयांची दुरुस्ती आवश्यक‘लोकमत’ ने पाहणी केलेल्या लक्ष्मी नगर, शिवाजी नगर भागात सार्वजनिक शौचालये आहेत. असे असतानाही देखील या भागातील नागरिक त्यांचा वापर न करता उघड्यावरच शौच करतात. त्यामुळे नागरिकांच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे. तर काही स्वच्छतागृहांची स्थिती अतिशय विदारक असल्याने नागरिकांना नाईलाजास्तव उघड्यावरच शौचास जावे लागते.
जळगाव शहरातील हगणदरीमुक्ती फक्त कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:40 PM
अनेक भागांमध्ये उघड्यावरच सर्रास शौच
ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियानाच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्हराजीव गांधीनगरातही घाण