ऑनलाईन लोकमतयावल, जि. जळगाव, दि. 15 - यावल शहरासह तालुक्यात गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. दहीगाव-वड्री परिसरात जोरदार वादळी पावसासह दहीगावला बोराच्या आकाराची गारपीट झाली़ यावल-दहीगाव रस्त्यावर सुरेशआबा नगराजवळ वादळाने झाड कोसळल़े गावातील नाल्यास पूर आला होता़ तालुक्यातील किनगाव, दहिगाव, वड्री परीसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसासोबत वादळ होते.
दहीगाव भागात वादळासह गारपीट
By admin | Published: June 15, 2017 6:19 PM