भुसावळ : येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरणाºया दिनदयाल नगरमधील घरे व इतर इमारती असे ९९ अतिक्रमणे १६ रोजी अतिक्रमण काढण्यास सकाळी नऊ वाजता प्रारंभ झाला. यासाठी या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला तर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या परिसरातील सर्व अतिक्रमणे काढण्यात आली.ही अतिक्रमणे काढताना नगरपालिकेचा हलगर्जीपणा दिसून आला. त्यांनी नगरपालिका दवाखान्याचे सामान खाली करण्याचे औदार्य दाखवले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. शहरातील दीनदयाल नगर जवळून महामार्ग जात असल्यामुळे या मार्गात येणाºया ९९ घरांचे अतिक्रमण १६ रोजी काढण्यात येणार असल्यामुळे लोकांनी स्वत:च सकाळपासून आपली घरे खाली करण्यास सुरुवात केली होती.दरम्यान, या घरांचे पुनर्वसन करण्यात यावे यासाठी नागरिकांनी मागणी केली होती. व आंदोलनही केले आहे. त्यामुळे अतिक्रमण काढत असताना महसूल व पोलीस प्रशासनातर्फे अतिक्रमण काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात काळजी घेण्यात आली.लोक संघर्ष समितीच्या कार्यालयाचा प्रथम पंचनामा करा !अतिक्रमणमध्ये येत असलेले जयप्रकाश नारायण सार्वजनिक संस्था संचलित लोक संघर्ष समितीच्या कार्यालयाचा अतिक्रमण काढताना पंचनामा करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी यांनी केली आहे. त्यांनी कार्यालयाच्या गेट जवळ ठिय्या मांडला व अतिक्रमण काढण्यास विरोध केला. यावेळी पोलिसांनी कार्यालय पाडणे थांबवून इतर अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला. याप्रसंगी पंधरा ते वीस मिनिट गोंधळ निर्माण झाला. मात्र सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी यांची डीवायएसपी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी समजूत काढून अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला.नगरपालिकेचे दुर्लक्षअतिक्रमण मोहिमेस सकाळी प्रथम नगरपालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र पाडण्यास प्रारंभ केला. यावेळी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी व संबंधित अधिकाºयांनी नगरपालिका दवाखान्यातील औषधी, पंखा, लोखंडी चॅनल गेट, दरवाजा यासह अनेक साहित्य दवाखान्यातच ठेवले होते. ते आधीच काढून घेण्याचा समजूतदारपणा दाखवला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी हे साहित्य लंपास केले.दरम्यान, या औषधीमध्ये मुदत संपलेले गोळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या गोळ्यांचा वापर नागरिकांनी केला तर , धोका निर्माण होऊ शकतो. यास जबाबदार कोण? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी या परिसरामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. तर डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरडकर अनिल मोरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पोळ, संजय भदाणे नीलेश बाविस्कर, दीपक जाधव, चंदू बोर्डे, समाधान पाटील, गजानन पालवे, संजय चौधरी, प्रताप पाटील यांच्यासह ८० पोलीस कॉन्स्टेबल, १८ महिला पोलीस कॉन्स्टेबल, तीन आर.सी. प्लेटून असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर महसूल विभागाचे नायब तहसीलदार सतीश निकम, मंडळाधिकारी शशिकांत इंगळे, तलाठी एम. एल. रत्नानी आदी उपस्थित होते. अतिक्रमण काढण्यासाठी चार जेसीबी, दोन पोकलेन, चार गाड्या, चार ट्रॅक्टर आदी पंधरा ते वीस वाहने यासह बत्तीस कर्मचाºयांनी ही मोहीम राबवली.
भुसावळ येथे ९९ अतिक्रमणांवर चालला ‘हातोडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 9:42 PM