संजय सोनवणेचोपडा, जि.जळगाव : तालुक्यातील वैजापूर आश्रमशाळेतील पाच विद्यार्थिनींची तब्येत बिघडली असून, त्यांना उलट्यांचा त्रास होत आहे. यामुळे विद्यार्थिनींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याच्या घटनेने खडबळ उडाली आहे.याबाबत आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व यावल येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही. पाचपैकी दोन विद्यार्थिनींना घरी पाठविले आहे, तर तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत.वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्यार्थिनींना आणण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णवाहिका बोलवून सायंकाळी सात वाजता चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.वैजापूर आश्रमशाळेच्या वसतिगृह अधीक्षक दोन दिवसापासून शासकीय कामानिमित्त यावल प्रकल्प कार्यालयात गेल्या असल्याने बाधा झालेल्या विद्यार्थिनींना शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले.दूषित पाण्यामुळे बाधा झाल्याची चर्चा सुरू आहे.
चोपडा तालुक्यातील वैजापूर आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 6:28 PM
चोपडा तालुक्यातील वैजापूर आश्रमशाळेतील पाच विद्यार्थिनींची तब्येत बिघडली असून, त्यांना उलट्यांचा त्रास होत आहे. यामुळे विद्यार्थिनींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याच्या घटनेने खडबळ उडाली आहे.
ठळक मुद्देपाच विद्यार्थिनी उपजिल्हा रुग्णालयात दाखलदोन विद्यार्थिनींना घरी पाठविले