आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाºया बोगस अपंग प्रमाणपत्राच्या वाटपाचा गैरफायदा घेत जळगाव जिल्ह्यात अपंग युनिटची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपंग प्रमाणपत्र प्रक्रिया आॅनलाईन होण्यापूर्वी हातोहात दिल्या जाणाºया प्रमाणपत्रांची संख्या जळगाव जिल्ह्यात मोठी असल्याचे आता समोर येऊ लागल्याने बोगसगिरीचा कळसही दिसून येत आहे.जि.प.चे अपंग युनिट बंद झाल्याने या युनिटमधील शिक्षकांचे जि.प. शाळांमध्ये समायोजन करण्यासंदर्भात हालचाली सुरू असताना बोगस अपंग युनिटचे प्रकरण समोर आले. राज्यातील एकूण ५९५ अपंग युनिटपैकी निम्म्याहून अधिक म्हणजेच २७५ अपंग युनिट एकट्या जळगाव जिल्ह्यात असल्याची बाब समोर आली आहे.‘बोगसगिरी’चा गैरफायदाअपंग प्रमाणपत्र वाटपासाठी जळगाव जिल्ह्यात दलालांचा मोठा सुळसुळाट झाला होता. त्यामुळे बोगस प्रमाणपत्रही मोठ्या प्रमाणात वाटप झाले. हे प्रमाणपत्र आता जमा होऊ लागल्याने ही बाब प्रकार्षाने समोर येत आहे. २००९-२०१० पूर्वी मोठ्या प्रमाणात हाताने लिहिलेले प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या लक्षात येत आहे. हे प्रमाणपत्र वाटप करीत असताना त्यासाठी बनावट शिक्केही तयार करण्यात आल्याचे दिसून आले, असे आता खुद्द आरोग्य विभागाकडूनच सांगितले जात आहे. हे प्रमाणपत्र देताना प्रमाणपत्राच्या वरच्या भागात संबधिताचे नाव व छायाचित्र असले तरी प्रमाणपत्राच्या खालील भागात वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे शिक्के व सह्या या खरोखरच्या एखाद्या प्रमाणपत्रावरून रंगीत झेरॉक्स काढून तिचा वापर करीत बोगस प्रमाणपत्र तयार केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारचे बोगस प्रमाणपत्र तयार करून एकेका अपंग युनिटसाठी आठ अपंग विद्यार्थी दाखवून अपंग युनिट उदयास आले असावे, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.बोगस प्रमाणपत्र होताहेत जमापूर्वी वाटप झालेले अपंग प्रमाणपत्र आता कोणत्याही ठिकाणी ग्राह्य धरले जात नसल्याने ते प्रमाणपत्र जमा करून नवीन आॅनलाईन नोंदणी करून प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. यामध्ये पूर्वीचे प्रमाणपत्र जमा करीत असताना वरील प्रकारची सर्व ‘बनवाबनवी’ लक्षात येऊ लागल्याने बोगस दिव्यांगही लक्षात येऊन बोगस प्रमाणपत्र जमा केले जात आहे.आॅनलाईनपूर्वीचा अधिक सुळसुळाट२०१३पासून अपंग प्रमाणपत्र वाटप प्रक्रिया आॅनलाईन झाली आहे. यामध्ये आता संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती घेऊन ती आॅनलाईनला अपलोड केली जाते. राज्यात कोठेही संबंधिताने यासाठी प्रयत्न केले असतील तर ती बाब तत्काळ लक्षात येते. तसेच बनावट प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न केला व नंतर ही बाब लक्षात आली तर संबंधिताची माहिती, प्रमाणपत्र क्रमांक उपलब्ध असल्याने त्यावर तत्काळ कारवाई करीत गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो. मात्र पूर्वी अशी प्रक्रिया नसल्याने हातोहात देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची संख्या सांगणे आरोग्य विभागाला कठीण असल्याचे समोर आले आहे.आॅनलाईन नोंदणी व प्रत्यक्ष प्रमाणपत्र संख्येत तफावतआॅनलाईन प्रक्रिया झाली असली तरी आतादेखील अनेक जण अपंगाचे प्रमाण ३० टक्के असेल तर ते ४० टक्के अथवा त्या पेक्षा जास्त करून मागतात. अशा वेळी जिल्हा रुग्णालयातून असे प्रकरण धुळे अथवा औरंगाबाद या वरीष्ठ केंद्रांकडे पाठविले जातात. त्यातील काही मान्य होतात तर काही अमान्य होतात. त्यामुळे अपंगांची नोंदणी व प्रमाणपत्रांची संख्या जुळणे कठीण असल्याचेही चित्र आहे.आॅनलाईन होऊनही संकेतस्थळावर माहिती उपलब्ध होईनाअपंग प्रमाणपत्र वाटप प्रक्रिया आॅनलाईन झाली असली तरी प्रमाणपत्रांची माहिती आॅनलाईन उपलब्ध नाही. संबंधित संकेतस्थळावरून माहिती घ्यायची झाल्यास ती केवळ तीनच महिन्यांची माहिती मिळू शकते, अशी सूचना येते, मात्र तीन महिन्यांचा कालावधी टाकला तरी माहिती उपलब्ध होत नसल्याने नेमके दिव्यांग किती असा प्रश्न उभा राहतो.
जळगाव जिल्ह्यात बेसुमार प्रमाणपत्र वाटपातून फोफावले अपंग युनिट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:54 AM
अपंग युनिटचा गोलमाल
ठळक मुद्देगैरफायदा आॅनलाईनपूर्वी बोगस अपंग प्रमाणपत्राचे ‘कनेक्शन’