गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : शहरातील जामठी रस्त्यावर भरपावसात चिमूटभर पोटासाठी भाजीपाला विक्री करून वडिलांना हातभार लावणाऱ्या सात-आठ वर्षाच्या बालकाचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत मदतीसाठी हात पुढे सरसावले आहेत.शहरापासून जवळच असलेल्या पण मलकापूर तालुक्याच्या हद्दीत येणारे गोरखेडा हे २५-३० घरांचे गाव आहे. कोरोनाने अनेकांचा रोजगार गेला. अनेकांना गावं शहरे सोडायला लावली. अशातच सुधाकर काळे यांनी पोटासाठी भाजीपाला विक्री सुरू केली. त्यांच्या घरात मंगेश हा सात वर्षांचा मुलगा. सध्या शाळा बंद असल्याने वडिलांना हातभात लागावा म्हणून मंगेश हा थेट वडिलांसोबत येतो. भाजीपाला विक्रीसाठी मदत करतो. असाच तो रविवारी रस्त्याच्या कडेला भर पावसात भाजीपाला विक्री करीत असल्याचे वृत्त 'लोकमत'च्या २७ जुलैच्या अंकात प्रसिद्ध झाले. ज्या वयात हातात पाटी-पेन्सिल, दप्तर पाहिजे ते हात भाजीपाला विक्री करीत असल्याचे वृत्त वाचून बोदवड शहरातील उद्योजक तथा अमर डेअरीचे संचालक अमर खत्री भावूक झाले. त्यांनी या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.दरम्यान, आपल्या मुलाची बातमी लोकमतला छापून आली आहे, हे मंगेशचे वडील सुधाकर काळे याना माहीत नव्हती. इतरांनी त्यांना सांगितले. पेपर तर आणला, पण त्याचे वडील अशिक्षित असल्याने त्यांना वाचताही येत नव्हते. दुसऱ्या एकाने त्यांना ही बातमी वाचून दाखवली. बातमी ऐकून त्यांचे उर भरून आले आणि डोळ्यातील पाणी त्यांना रोखता आले नाही.अमर खत्री यांचे मंगेशच्या वडिलांशी 'लोकमत'ने बोलणे करून दिले. तेव्हा सुधाकर यांचा उर भरून आला. त्यांनी त्यांचे ऋण व्यक्त करत आपल्या हातात असलेली गवती चहाची गड्डी देण्यासाठी हात पुढे केला व पैसे घेण्यास नकार दिला.
भाजीपाला विकणाऱ्या बालकाच्या मदतीसाठी सरसावले हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 4:59 PM
भाजीपाला विक्री करणाऱ्या बालकाच्या मदतीसाठी हात पुढे सरसावले आहेत.
ठळक मुद्देशिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे उद्योजकाचे आश्वासनमुलाची बातमी पाहून अडाणी बापाचे उर आले भरूनप्रभाव लोकमतचा