शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

काँग्रेस - राष्ट्रवादीचे हात शेतक-यांच्या रक्ताने माखलेले : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 5:13 PM

चाळीसगावच्या कृषि महोत्सवात विरोधकांवर हल्लाबोल

ठळक मुद्देयोजनांची जत्राचा चाळीसगाव तालुक्यातील अडीच लाख लोकसंख्येला फायदावरखेडे - लोंढे धरण दोन वर्षात पुर्ण होईलकडधान्य साठविण्यासाठी खासगी गोडावूनही आरक्षित

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि. ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात विधानभवनाच्या प्रांगणात शेतमाल विक्रीचा बाजार भरवला गेला. १५ वर्षात काँग्रेस - राष्ट्रवादीने शेतक-यांना लुटण्याचे एकमेव काम केले. त्यांचे हात शेतक-यांच्या रक्ताने माखले असल्याचा आक्रमक हल्लाबोल करीत कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधकांचा समाचार घेतला.चाळीसगाव येथे चार दिवसीय कृषि महोत्सव, शासकीय योजनांची जत्रा, ४३वे विज्ञान प्रदर्शन या कार्यक्रमांचे उदघाटन शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्व, उत्तमराव पाटील विचार मंचावर जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आमदार उन्मेष पाटील, आमदार स्मिता वाघ, जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे, पं.स.सभापती स्मितल बोरसे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपसभापती संजय पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.पुढे बोलतांना सदाभाऊ खोत यांनी शासनाचे लोककल्याणकारी निर्णय, योजना उपस्थितांसमोर मांडल्या. कांदा उत्पादक शेतक-यांचे नुकसान होऊ नये म्हणून ८० टक्के कांदा चाळींना पूर्व संमती देण्यासह ११ एप्रिल पर्यंत आॅनलाईन पद्धतीने शेतक-यांचा हरभरा, तूर खरेदी केले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. खरेदी केलेले कडधान्य साठविण्यासाठी खासगी गोडावूनही आरक्षित करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.मागच्या कार्यकाळात सिंचन कमी आणि पैसा आडवा, पैसा जिरवा. हाच उद्योग केला गेला. मात्र गेल्या साडे तीन वर्षात सरकारने जलयुक्त शिवार योजना प्रभाविपणे राबविल्याने १६ हजार गावे टँन्करमुक्त झाली आहेत. त्यांनी कृषि महोत्सवाच्या आयोजनाचे कौतुक करतांनाच राज्यातील हा पथदर्शी उपक्रम असल्याचे गौरवदगारही काढले.वरखेडे - लोंढे धरण दोन वर्षात पुर्ण होईल - गिरीष महाजनवरखेडे - लोंढे धरणाला आघाडी सरकारच्या कार्यकाळात फक्त ३३ कोटी रुपये मिळाले. गेल्या साडे तीन वर्षात या धरणासाठी १३५ कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. धरणाला नुकतीच केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळाली आहे. यामुळे बळीराजा सन्मान या केंद्रीय योजनेत समावेश झाल्याने ५०० कोटी रुपयांचा सुधारीत आराखडा मंजुर झाला आहे. त्यामुळे २०१९ पूर्वीच हे धरण पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. गिरणेवरील सात बलून बंधा-यांचे काम महिन्याभरात सुरु होणार आहे. यासाठी आवश्यक असणारा जलआराखडा मंजुर झाला आहे. बलून बंधा-यांमुळे गिरणा बाराही महिने खळाळणार असून चाळीसगाव तालुका दुष्काळमुक्त होईल, असेही महाजन यांनी सांगितले. चाळीसगाव शहरासाठी ७१ कोटीची सुधारीत पाणी पुरवठा मंजुर झाली आहे. भूयारी गटारी योजनेचा प्रस्ताव दाखल करा. यासाठी लागणारे १६० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. उन्मेष पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित हा उपक्रम राज्यासाठी आदर्श आहे. एकाच छताखाली शेतकरी, अधिकारी, मार्गदर्शक, तंत्रज्ञ, विद्यार्थी - शिक्षक आणणे ही अभिनव कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.अडीच लाख लोकसंख्येला फायदा : आमदार उन्मेष पाटीलकृषि महोत्सव, योजनांची जत्रा आणि विज्ञान प्रदर्शनातून चाळीसगाव तालुक्यातील अडीच लाख जनतेला फायदा होणार असल्याचे आमदार उन्मेष पाटील यांनी सांगितले. १५२ शासकीय योजनांची माहिती, राज्यभरातील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग, कृषि तंत्रज्ञान, शेतक-यांना मार्गदर्शन, योजनांचे लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत शासन पोहचणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी आदर्श शेतक-यांना यावेळी गौरविण्यात आले.खासदार एस.टी.पाटील, आमदार स्मिता वाघ यांचीही भाषणे झाली. सुत्रसंचालन प्रा. डॉ. किरण गंगापुरकर यांनी केले. आभार स्मितल बोरसे यांनी मानले.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावSadabhau Khotसदाभाउ खोत Jalgaonजळगाव