शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

हणमंतराव गायकवाड, विजय दर्डा यांचे रविवारी जळगावात प्रेरणादायी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:27 PM

‘एसडी-सीड’ शिष्यवृत्ती सोहळा

ठळक मुद्दे६०० विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

जळगाव : प्रसिद्ध उद्योजक, भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड (पुणे) व लोकमत समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण सोहळा होत आहे. यावेळी या दोन्ही मान्यवरांचे विद्यार्थी व पालकांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन मिळेल. संपूर्ण कुटुंबाने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असा हा अपूर्व सोहळा आहे.एसडी-सीड अर्थात सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजनेंतर्गत गरजू आणि गुणवंत अशा ६०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे.विद्यार्थी हितासाठी १२९ संस्थांसोबत सहकार्य करार केले असून अनेक विद्यार्थी त्या सुविधांचा लाभ घेत आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन आणि जॉब फेअर,कॅम्पस इंटव्ह्यू आणि उद्योजकता विकास शिबिरांचे नियमित आयोजन करून नवनवीन रोजागाराच्या व उद्योगाच्या संधींची उपलब्धता करून दिली जात आहे. गुणवत्ता आणि गरजेनुसार ५ ते ५० हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थी पालक, शिक्षक, प्राध्यापक, उद्योजक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमींनी या सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन एसडी-सीडच्या अध्यक्षा रत्नाभाभी जैन, कार्याध्यक्षा मीनाक्षी जैन, गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.१३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला लाभजिल्ह्यातील गोरगरिब, गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी ही शिष्यवृत्ती योजना २००८ मध्ये सुरु करण्यात आली. आतापर्यंत १३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. एकूण ३१०० हून अधिक विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्याशिवाय ३० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना विविध विषयांवर तसेच २ हजाराहून अधिक युवतींना भावनिक, मानसिक सबलीकरणासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.विद्यार्थी व पालकांसाठी ‘मेजवाणी’हणमंतराव यांच्यासोबत ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा हे सुद्धा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करणार आहेत. दर्डा हे १६ वर्षे राज्यसभेचे सदस्य होते. जागतिक वुमन समिट व लोकमत सखी मंचच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी ते प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांना या दोन्ही मान्यवरांसोबत संवाद साधण्याची अमूल्य संधी मिळणार आहे. तसेच प्रथम येणाऱ्या २०० विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉ सोडतच्या माध्यमातून ५ भाग्यवंतांना या मान्यवरांसोबत जेवणाचा मान मिळणार आहे.आठ कर्मचाºयांपासून सुरु झालेल्या कंपनीला ७० हजार कर्मचाºयांपर्यंत पोहचविणारे, रहिमतपूर ते लंडन व्हाया पुणे अशी जगभर सेवा क्षेत्रात ख्याती असलेल्या हणमंतराव गायकवाड यांची आहे. तरुणांनी उद्योग क्षेत्रात यशस्वी कसे होता येईल, छोटा उद्योग मोठा कसा करावा, उद्योगाच्या स्थानिक व जागतिक संधी, यशस्वी करिअरसाठी आवश्यक कौशल्य व क्षमता याबाबत हणमंतराव हे मार्गदर्शन करणार आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव