आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१ : हनुमान जन्मोत्सवाची तयारी म्हणून हनुमान मंदिरावर झेंडा लावायला गेलेल्या तरुणाला उच्च क्षमतेच्या वीज तारांचा स्पर्श झाल्याने आशिष निंबा दळवी (वय १९) हा तरुण मंदिराच्या शेडवरील पत्र्यावर फेकला गेला. गळ्यातील तुळशीच्या माळेतील मणीमुळे शरीराला फारसा झटका बसला नाही, हनुमानाचीच कृपा म्हणून आशिष या दुर्घटनेतून बचावला आहे. सुप्रीम कॉलनीतील पोलीस लाईनच्या नजीक असलेल्या इंद्रप्रस्थनगरात शनिवारी सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.हाताला व पायाला जखमगल्लीतील प्रकाश पाटील हे घरून पेनड्राईव्ह व कॉड घेऊन घरून येत असताना त्यांच्याजवळ पत्नीने पंचामृत दिले. दहा मिनिटांनी मंदिराजवळ पोहचले तर आशिष दिसत नव्हता. आवाज दिल्यावरही प्रतिसाद मिळत नव्हता. शेडवर मात्र हालचाल होत असल्याचा आवाज येत होता. त्यामुळे पाटील यांना शंका आली. शेडवर जाऊन पाहिले तर आशिष तेथे हातपाय झटकत होता. हाताच्या दंडावरील त्वचा बाहेर आली होती तर पायाला जखम झाली होती. हा प्रकार पाहिल्यानंतर तातडीने त्याला रिक्षाने खासगी रुग्णालयात हलविले.भंडाऱ्याचा कार्यक्रम रद्दआशिषला विजेचा धक्का बसल्याने भंडाºयाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. गल्लीतील सर्व कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली. आई, वडिलांनीही तातडीने घटनास्थळ गाठले. मुलाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचा जीवात जीव आला. आशिष हा दोन बहिणींचा एकुलता भाऊ आहे. एक बहीण विवाहित तर दुसरी अविवाहित आहे. नुकतीच त्याने बारावीची परीक्षा दिली आहे.महावितरण बळी जाण्याची वाट पाहत आहे का?या ठिकाणी दोन वर्षापूर्वी वीज तारांवरील पाणी अंगावर पडल्याने एका जणाचा हात निकामी झाला आहे. तर याच परिसरात काही वर्षापूर्वी वीज धक्क्याने एका जणाचा मृत्यू झाला आहे. या वीज तारा इतरत्र हलवाव्यात किंवा त्यांच्यात पाईप टाकावा अशी मागणी रहिवाशांकडून सातत्याने होत आहे, मात्र याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. महावितरण बळी जाण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवालही रहिवाशांनी केला.
जळगावात गळ्यातील तुळशीच्या माळेने वाचला हनुमान भक्तांचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 4:40 PM
हनुमान मंदिरावर झेंडा लावायला गेला असता झाला वीज तारांचा स्पर्श झाल्याने जखमी,
ठळक मुद्देमहावितरण बळी जाण्याची वाट पाहत आहे का?भाविकांनी केला भंडाºयाचा कार्यक्रम रद्दजखमी आशिषच्या हाताला व पायाला जखम