शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

हनुमान मंदिरामुळे परिसराला पडले हनुमानवाडी नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2017 3:00 PM

चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी भागात 100 वर्षापूर्वीचे जागृत हनुमान मंदिर असून हे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.

चाळीसगाव,दि.11- शहरातील  हनुमानवाडी भागात 100 वर्षापूर्वीचे जागृत हनुमान मंदिर असून हे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.  दररोज भाविकांची दर्शनासाठी मंदिरात गर्दी दिसते. याठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळते.
11 रोजी हनुमान जयंती असून त्यानिमित्त शंभर वर्षपूर्वीच्या या मंदिराला रंगरंगोटी करूय तोरण, लायटींग व सजावटीचे कामही केले आहे. नवसाला पावणारा मारुती अशी ख्याती असल्याने अनेक भाविक येथे श्रध्देने येतात. त्यामुळे या मंदिराची जागृत स्थान म्हणून ख्याती आहे.
शेकडो  वर्षापूर्वी हे मंदिर उभारण्यात आले त्यावेळी या परिसरात नागरी वस्ती नव्हती. कालांतराने मंदिर परिसरात मोठय़ा प्रमाणात चारही बाजूने नागरी वस्ती झाली आहे. या मंदिरामुळेच या भागाला हनुमानवाडी असे नाव पडले   आणि आता हा परिसर शहराचा मध्यवर्ती असा भाग आहे. माजी कायदा मंत्री हरी विनायक पारसकर, शिवदुलारे शुक्ल, बुधेसिंग राजपूत व इतरांनी या मंदिराची उभारणी साधारणपणे  1920 च्या आसपास केली.  सुरुवातीला या मंदिराची जबाबदारी दत्तात्रय बंडू पाठक यांचेकडे पारसकर यांनी दिली. नंतर 1955 ते 2008 या कालावधीत त्यांचे पुत्र मुरलीधर दत्तात्रय पाठक यांनी पुजारी म्हणून कामकाज पाहिले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र प्रशांत मुरलीधर पाठक हे काम पाहात आहेत. सद्यस्थितीत तिस:या पिढीकडून या मंदिराची देखभाल होत आहे. मंदिर परिसरात वर्षभर विविध कार्यक्रम  उत्साहात पार पडतात.
रामनवमी, हनुमान जयंती दरवर्षी साजरी केली जाते. कार्तिक महिन्यात महिनाभर काकडारती होते  तर कार्तिक पौर्णिमेला दिवसभर रामनामाचा जप आणि भंडा:याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मंदिर आवारात महादेवाचेही स्थान असून येथे पूर्वी पिंड स्थापन करण्यत आली होती. तीन वर्षापूर्वी महादेव व गणेशाची मूर्ती स्थापित करण्यात आली. तसेच बाजूलाच जय बजरंग व्यायामशाळाही उभारली आहे.  (छायाचित्र: संजय सोनार)