सर्व मुलींना विचारले, की तुमचा आवडता सण कोणता? तर सर्वाचे एकच उत्तर येईल ते म्हणजे भुलाबाईचा सण. ‘भाद्रपदाचा महिना आला, आम्हा मुलींना आनंद झाला’ या गाण्यातूनच मुली व महिलांचा उत्साह आपल्याला दिसून येतो. जळगाव येथील केशव स्मृती प्रतिष्ठानच्या ललित कला अकादमीतर्फे गेल्या 14 वर्षापासून भुलाबाई महोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा या महोत्सवाचे पंधरावे वर्ष आहे. भुलाबाई महोत्सवानिमित्त पारंपरिक स्त्री गीतांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्याचा प्रय} केला जात आहे. भाद्रपद पौर्णिमेला म्हणजेच गणपती विसजर्नाच्या दुस:या दिवशी भुलाबाईंचे आगमन होते. भुलाबाईची सजावट करताना पण आम्हाला छान वाटते. आम्ही थर्माकोलचे मखर लावतो. तसेच त्याभोवती विद्युत रोषणाई चमकते. रोज संध्याकाळी आजूबाजूची विविध फुले तोडून आणतो आणि हार तयार करतो. महिनाभर चालणा:या या उत्सवाने आमच्या घरातदेखील उत्साहाचे वातावरण असते. आम्हाला भुलाबाई हे नावच सुरुवातीला मोठे गमतीशीर वाटायचे. यावर आईने सांगितले की, भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोजी म्हणजे शंकर याचे प्रतीक असे मानले जाते. पार्वती पौर्णिमेला माहेरी येते एक महिना थांबून कोजागिरी पौर्णिमेला सासरी जाते, अशी दंतकथा आहे. या एक महिन्यात रोज संध्याकाळी भुलाबाईंच्या स्तुतीची गाणी टिप:यांच्या तालावर म्हटली जातात. गाणी झाली की, खरी मजा असते ती खाऊची. फक्त खाऊ खायचा असे नाही तर तो ओळखावा लागतो. त्यासाठी प्रत्येकीमध्ये चढाओढ लागली असते. रोज नवीन नवीन खाऊ यानिमित्ताने आम्हाला खायला मिळतो. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या पदार्थाची नावे व चवी आम्हाला कळतात. त्यामुळेच भुलाबाईचा उत्सव आम्हा मुलींना विशेष आवडतो. कारण महिनाभर गाणी, नाच व खाऊ अशी धम्माल आम्ही करीत असतो. भुलाबाईची गाणीसुद्धा मोठी गमतीशीर आहे. त्यातून फारसा अर्थ निघत नाही. केवळ यमक जुळवून ही गाणी तयार केली आहे. उदा.. अडकीत जावू बाई खिडकीत जावू । खिडकीत होता झोपाळा, भुलाबाईला मुलगा झाला नाव ठेवू गोपाळा।। किंवा यादवराया राणी बैसली कैसी। सासुरवासी सुनबाई घरात येईना कैसी।। अशी बरीच गाणी भुलाबाईंची आहेत. या गाण्यातून तिचे माहेरविषयीचे प्रेम आणि सासरच्या तक्रारी दिसून येतात. तर काही गाणी फारच हास्यास्पद आहे. ही गाणी म्हणताना तर आमची हसता हसता पुरेवाट होते. भुलाबाईचा शेवटचा दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी गोड, आंबट-गोड, नमकीन अशा चवीचे पदार्थ तसेच विविध फळे असतात. आईच्या मैत्रिणी त्यांच्या मुलांना व भुलाबाईला घेऊन एका ठिकाणी जमतो. मग आधी भुलाबाईची गाणी आम्ही म्हणतो तसेच टिप:या खेळतो आणि मग खाऊचा फडशा पाडतो. मी दरवर्षी आईसोबत भुलाबाई महोत्सवाला न चुकता जात असते, कारण तिथे मला एकापेक्षा एक छान भुलाबाईंची गाणी ऐकायला मिळतात. केश्वस्मृतीमुळे हा छोटय़ा सणाला महोत्सवाचे रूप आलेले आहे. त्यांच्यामुळेच आम्ही हा पारंपरिक वारसा चालवू, याची मला खात्री आहे.
भुलाबाईचा आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 1:15 AM