शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

जळगावात शुभेच्छांनी होणार नाताळाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 5:02 PM

प्रभू येशूंनी सांगितलेला शांती, समृद्धी व एकात्मतेचा संदेश आणि त्यासोबत घरोघरी नाताळच्या शुभेच्छा देऊन ख्रिश्चन बांधवांच्या नाताळ सणाला शुक्रवारी सुरुवात होत आहे.

ठळक मुद्देजळगावात नाताळाचा उत्साहआकर्षक विद्युत रोषणाईने चर्च सजलेख्रिश्चन बांधवांच्या घरोघरी फराळाचा सुगंध

जळगाव : प्रभू येशूंनी सांगितलेला शांती, समृद्धी व एकात्मतेचा संदेश आणि त्यासोबत घरोघरी नाताळच्या शुभेच्छा देऊन ख्रिश्चन बांधवांच्या नाताळ सणाला शुक्रवारी सुरुवात होत आहे. शहरातील तिन्ही चर्चमध्ये ख्रिसमसची जय्यत तयारी करण्यात आली असून, आकर्षक विद्युत रोषणाईने चर्च सजले आहेत.अवघ्या चार दिवसांवर नाताळ सण आल्याने, रामानंदनगर येथील सेंट फ्रान्सिस डी फेल्स चर्च, मेहरुण येथील थॉमस चर्च व पांडे डेअरी चौकाजवळील अलायन्स चर्च या ठिकाणी ख्रिसमस साठी जोरदार तयारी सुरु आहे. तिही चर्चमध्ये आठवडाभर दररोज वेगवेगळ््या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, आजपासून चर्चच्या परिसरातील घरोघरी लहान मुले मेणबत्ती भेट देऊन, नाताळच्या शुभेच्छा देणार आहेत.येशूंचे गाणे म्हणून देणार शुभेच्छाख्रिश्चन बांधवांचा पवित्र सण मानल्या जाणाऱ्या नाताळ उत्सवासाठी समाज बांधवांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. २५ रोजी नाताळ असल्याने प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाच्या स्वागतासाठी लहान मुले चर्चच्या परिसरातील नागरिकांच्या घरोघरी आजपासून शुभेच्छा देण्यासाठी जाणार आहे.अलायन्स चर्चयेथील लहान मुले शिवाजीनगर, दुध फेडरेशनमार्गे पिंप्राळा मार्गे घराघरी जाऊन नाताळच्या शुभेच्छा देणार आाहेत. सेंट फ्रान्सिस डी फेल्स चर्चमधील मुले रामानंदनगर व महाबळ परिसरात शुभेच्छा देणार असून, मेहरुण येथील थॉमस चर्च मधील मुले मेहरुण परिसरात घरोघरी जाऊन शुभेच्छा देणार आहेत.घरोघरी फराळाचा सुगंधदिवाळी प्रमाणे ख्रिश्चन बांधव नाताळ सण साजरा करत असतात. यासाठी प्रत्येक घरी चकली, करंजी, लाडू, डोनस आदी विविध गोड पदार्थ तयार केले जातात. नाताळाच्या एकमेकांच्या घरी गोडपदार्थ पाठवून, नाताळाच्या शुभेच्छा दिल्या जातात.एकमेकांना घरी फराळाला बोलावले जात असल्याने सध्या घरोघरी फराळ बनविण्याची जय्यत तयारीदेखील सुरु आहे.

टॅग्स :ChristmasनाताळJalgaonजळगाव