जळगाव : प्लॉट घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावेत यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहूनगर येथील माहेर असलेल्या पीडित महिलेचा विवाह बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील अब्दुल वसीम शेख अजीज यांच्याशी झाला. लग्नानंतर सुरुवातीचा दीड महिना चांगला गेला. त्यानंतर पती अब्दुल वासीम यांनी घर बांधण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन यावे विवाहितेला सांगितले. मात्र १० लाख रुपये आपण देऊ शकत नाही. त्यावरून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. याला पाठबळ म्हणून सासरे शेख अजीज शेख सत्तार, शेख इम्तियाज शेख अजीज, यास्मिनबी फिरोज खान, शाहिस्ताबी नईम पठाण, शेख हकीम शेख अजीज, शेख जुनेद शेख अजीज, शेख अजीम शेख अजीज (सर्व रा.वडनेर भोलजी ता. नांदुरा जि. बुलडाणा) यांनीदेखील टोमणे मारून गांजपाठ केला. हा प्रकार असह्य झाल्याने विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात पतीसह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार संगीता खांडरे करीत आहेत.