खामगाव: कामधंदा येत नाही तसेच हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून बोरीअडगाव येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरकडील ९ जणांविरोधात विविध कलमान्वये शहर पोलीसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. विवाहितेने न्याय मिळण्यासाठी खामगाव येथील न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट नं.२ यांच्याकडे दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशान्वये शहर पोलीसांनी सीआरपीसी कलम १५६ (३) प्रमाणे छळाचा गुन्हा दाखल केला.
याबाबत खामगाव तालुक्यातील रामनगर विहिगाव माहेर असलेल्या सौ. आरती गणेश ठाकरे (२३) या विवाहितेने तक्रारीत नमूद केले की, हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून तसेच काम धंदा येत नसल्याच्या कारणावरून सासरच्यांनी अतोनात छळ केला. सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या छळाला त्यांच्या कुटुंबियांकडून प्रोत्साहन दिल्या जात असल्याचा आरोप तक्रारीत केला.
या तक्रारीवरून पती गणेश काशिराम ठाकरे (२९) , सासरा काशीराम गोविंदा ठाकरे (५५), सासू नंदा काशीराम ठाकरे (५२), जेठ शिवाजी काशीराम ठाकरे (३१), जेठाणी ज्ञानेश्वरी शिवाजी ठाकरे (२९) सर्व रा. बोरी अडगाव ता. खामगाव, नंणद रूपाली गजानन मोरखडे (३३), नंदोई गजानन मोरखडे (३७) दोघेही रा. कुंबेपॐळ ता. खामगाव, नणंद जिजा भगवान तोंडे (३२), भगवान तोंडे (३६) रा. नायदेवी, ता. खामगाव यांच्या विरोधात भादंिव कलम४९८ ( अ ) , ३२३, ५०४, ३४ अन्वये न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.