जळगाव,दि.20- आयुक्त व उपायुक्तांच्या मंजुरीनंतर अनुकंपा नियुक्तीच्या पदात बदल करणा:या आस्थापना विभागातील लिपिकाला दिलेल्या बडतर्फीच्या नोटीसचा खुलासा असमाधानक असतानाही विभागीय चौकशीचे आदेश देऊन थेट कारवाई करणे टाळण्यात आले आहे. विशेष म्हणजे बडतर्फीची नोटीस मिळालेल्या लिपिकानेच बुधवारी 16 कर्मचा:यांच्या अनुकंपा नियुक्तीचे आदेश तयार केले.
मनपातील कनिष्ठ अभियंता असलेल्या एका अधिका:याचा सेवाकाळातच मृत्यू झाल्याने त्यांच्या जागी त्यांच्या मुलाला नियुक्ती देण्यात येणार आहे. अनुकंपाच्या यादीतील क्रमानुसारच नियुक्ती दिली जाणार असली तरी त्यातही तब्बल 7 लाखांचा व्यवहार झाल्याची उघड चर्चा मनपा वतरुळात सुरू आहे. टिपणीस आयुक्त, उपायुक्तांनी मंजुरीही दिली होती.
मात्र नंतर आस्थापना विभागात त्यात खाडाखोड करून आरेखक ऐवजी रचना साहाय्यक या वर्ग 3 श्रेणीतील उच्च पदावर नियुक्ती देण्याचा बदल करण्यात आला. ही बाब आयुक्तांच्या लक्षात आल्याने त्यांच्या आदेशावरून उपायुक्तांनी आस्थापना विभागातील संबंधित लिपिक सोनवणे यांना गुरूवार, 13 रोजी बडतर्फीची नोटीस बजावून असून तीन दिवसांत खुलासा मागविला होता. मात्र तो खुलासा असमाधानकारक असल्याने संबंधित वरिष्ठ लिपिकाची विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र आयुक्तच जूनअखेर सेवानिवृत्त होत असल्याने ही विभागीय चौकशी निव्वळ फार्स ठरण्याची चर्चा आहे.
अनुकंपाचे आदेश तयार
अनुकंपा भरतीतील आर्थिक घोळाचा विषय गाजत असतानाच दुसरीकडे बुधवारी या अनुकंपा भरतीसाठी 16 उमेदवारांचे नियुक्ती आदेश तयारही करण्यात आले.