प्रसाद धर्माधिकारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनशिराबाद : अवकाळी पावसाने शेतकऱ्याला न घर का ना घाट का अशी स्थिती आणली आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने फुलवलेल्या शेतीची पावसाच्या तडाख्याने वाताहत झाली आहे.शेतांमध्ये पाणी साचल्याने मिरची, टमाटे पिके सडले आहेत. डाळिंबाची फुले,फळे गळून पडली आहे. खरीप हंगामाची पुरी वाट लागली आहे. फळभाज्यांचे शेतीचे अद्याप पंचनामे झाले नसल्याची ओरड नशिराबादला शेतकºयांनी केली आहे.यंदाच्या पावसाने सर्वांना चांगलेच झोडपले आहे. खरीप हंगामातील ज्वारी कांदा कापूस मका सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पावसाने फिरविले पाणीपरिसरात अनेक शेतकºयांनी आपल्या फळे,पालेभाज्या फुलविला होत्या. मात्र सततच्या पावसाने त्यावर पुरे पाणी फिरवले. शेतात साचलेल्या पाण्यामुळे उघडीत न मिळाल्याने मिरची झाडावरच परिपूर्ण पणे लाल होऊन सडली. आणि टमाटे तर झाडावरून गळून पडली व त्याच पाण्यामध्ये सडली आहे.शेतकºयाची अवस्था बिकटनगदी पीक विक्रीस जाण्यापूर्वीच अशी बिकट अवस्था झाली. अवकाळी पावसाने डाळिंबाचे बहरलेले फळे-फुले गळून पडली. डोळ्यादेखत पिकांची झालेली नासधूस पाहून शेतकरी रडकुंडीस आला आहे. पिके बहरण्यासाठी खते, निंदणी ,मजुरी हा खर्चही निघाला नाही. कजार्चा डोंगर वाढत आहे. प्रशासनाचे अधिकारी अद्याप पंचनामा करायला आलेली नाही. जीवन जगावं तरी कसं. अशी स्थिती निर्माण झाली आहे.माझी शेतातील टमाटे झाडे करपले असून टमाटा गळून सडला आहे.सुरुवातीला पिके चांगली होती मात्र हवामानामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला. कीटकनाशके फवारणी केली.त्यातच अवकाळी पावसाने तर पुरी वाट लावली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. मिरचीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले .नुकसान भरपाई मिळावी. शासनाने मदत करावी हीच अपेक्षा. - सोपान भोजू रोटे, शेतकरीअवकाळी पाऊसाने कांदा सडला सोयाबीन ज्वारी चे नुकसान झाले. व्याजाने पैसे घेऊन पेरणी केली होती. पिकेच वाया गेले. कर्ज फेडू कसे. त्यात म्हैस दगावली. यंदा दिवाळी अंधारातच गेली.- उषा मधुकर धनगर, शेतकरी
कष्टाने फुलविलेल्या शेतीची झाली वाताहत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 10:00 PM