लोकमत आॅनलाईनचोपडा, दि.१८ : शेतातून पिकवलेला माल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणल्याबरोबर तो कमी भावाने खरेदी केला जातो, ही नेहमीचीच ओरड असून कांद्याबाबत तर हा नेहमीचा अनुभव आहे. त्यामुळे शेतकºयांचा लागवडीचा खर्च देखील निघत नाही. तालुक्यातील कांदा उत्पादकांबाबतही सद्या तेच घडत आहे चाळीस किलोच्या कांद्याच्या एका गोणीस केवळ दोनशे ते सव्वादोनशे रुपये भाव मिळत असल्याने कांदा लागवडीस लागणारा खर्चही निघणे कठीण झाले आहे. या प्रकारामुळे शेतकरी हैराण झाला असून शासनाने माल उत्पादनाकरिता येणाºया खर्चाचा ताळेबंद लावून हमीभाव द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करीत आहेत.कांदा हे नाशवंत पीक आहे. यामुळे तो कुठे ठेवावा असा गंभीर प्रश्न शेतकºयापुढे दरवर्षी निर्माण होतो. उत्पादनाला लागलेला खर्च निघावा म्हणून शेतकºयांना कांदा विक्रीस काढत बाजारपेठेत आणावा लागतो. अशावेळी कांदा घेणारे व्यापारी मनमानी किमतीत शेतकºयांना मागणी करतात. शासनाने हमीभाव ठेवला असता तर शेतकºयांना थेट बाजारपेठेत शेतमाल नेता आला असता पण कांद्याला व इतर शेती मालाला हमीभाव नाही. मजुरांचे पैसे देणे गरजेचे असल्याने नाईलाज म्हणून शेतकरी व्यापाºयांना पडेल त्या भावात कांदा विकत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनाने प्रत्येक तालुकास्तरावर कांद्याचे हमीभाव मार्केट सुरू करावे. यातून शेतकºयांना शेतीमालास चांगला भाव मिळेल त्यामुळे लागलेला खर्च निघण्यास मदत होईल अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात आली आहे . तसेच तालुक्यात पूर्व भागाला अडावद येथेच उपबाजारपेठेत कांदा खरेदी केला जातो, आणि चोपड्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारपेठेत मात्र कांद्याची लिलाव प्रक्रिया होत नसल्याने चोपडा येथेही कांदा विक्री सुरू व्हावा अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. दरम्यान, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ पाटील यांनी याचा विचार करून चोपडा येथेही कांदा मार्केट सुरू करावे अशीही मागणी होत आहे.
कांद्याला हमीभाव नसल्याने चोपडा तालुक्यातील शेतकरी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 7:18 PM
कांदा उत्पन्नातून लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने चोपडा तालुक्यातील उत्पादक शेतकरी चांगलाच हैराण झाला आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही हाच अनुभव येत असल्याने हमी भावाने कांदा खरेदीची मागणी केली जात आहे.
ठळक मुद्देचोपडा कृषी उत्पन्न बाजारात कांदा खरेदी सुरू करण्याची मागणीशेतकºयांकडून पडेल भावातही कांदा विक्रीएका गोणीस दोनशे ते अडीच रुपये भाव