शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

चाळीसगावला गावगाड्यात राजकीय हंगामाची सुगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 2:26 PM

रणधुमाळी  ग्राम पंचायत निवडणुकीची

ठळक मुद्दे७६ ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी घमासान भाजपविरुद्ध महाविआमध्येमातब्बरांची प्रतिष्ठा पणाला

चाळीसगाव : तालुक्यातील ११० पैकी ७६ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. थंडीच्या गारठ्यात राजकीय हंगामाची सुगी बहरल्याचे चित्र गावागावात दिसून येत आहे. भाजपविरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार असल्याने पॕनल गठित करण्यासाठी बैठका होऊ लागल्या आहे. मातब्बरांच्या गावातही निवडणुकीचा धुरळा असल्याने त्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. नामनिर्देशपत्र २३ पासून भरले जाणार आहे. ७६ ग्रामपंचायतींसाठी सामने होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. ग्रामपंचायतींची संख्या पाहता तालुक्याच्या जवळपास ७० टक्के भागात सद्य:स्थितीत राजकीय फिव्हर आहे. ऐन थंडीत गावगाड्यात गरमागरम राजकीय चर्चा रंगू लागल्या आहे. पॕनलप्रमुख बलाढ्य उमेदवारांचा शोध घेण्यात गुंतले असून, काही गावांमध्ये बैठकांवर बैठका सुरू आहेत. गावगाड्यात राजकारण नको म्हणून निवडणुका बिनविरोध करण्याकडेही कल वाढला आहे. काही गावांमध्ये युवक फ्रंटफूटवर आल्याने तिरंगी आणि चौरंगी लढती रंगण्याची शक्यता आहे. प्रचाराचा तोंडावळा साहजिकच स्थानिक प्रश्नांभोवती असला तरी भाजपविरुद्ध महाविआ असेच सामने होणार. हे जवळपास स्पष्ट आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी निवडणूक बिनविरोध करणा-या ग्रामपंचायतींना २० लाखांचा विकास निधी देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या भूमिकेला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुकाचे ठरावे. नेतृत्व सिद्ध करण्यासाठी चढाओढ११० पैकी ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २३ रोजी नामनिर्देशपत्रे भरायला सुरुवात होईल. ४ जानेवारी रोजी माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. १५ रोजी मतदान, तर १८ रोजी निकालाचे बार फुटतील. एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने तालुक्याच्या राजकीय पटलावर वर्चस्व राखण्यासाठी दिग्गजांमध्ये चढाओढही सुरू झाली आहे. भाजपतर्फे आमदार मंगेश चव्हाण, खासदार उन्मेष पाटील, तर महाविआकडून माजी आमदार राजीव देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शिवसेना व काँग्रेसची भूमिकादेखील महत्वपूर्ण ठरणार आहे. भाजपातील अंतर्गत कलह धुमसतच राहिला तर साहजिकच त्याचा फायदा महाविआ होईल, असाही सूर चर्चिला जात आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर नूतन वर्ष अखेरीस नगर पालिका तर पुढील वर्षी २०२२ मध्ये पं.स. आणि जि.प.साठी लढाई होणार आहे. त्यामुळे ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढील राजकीय समीकरणांसाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे. 

टाकळी प्र.चा.मध्ये सर्वाधिक चुरसशहरालगत असणा-या टाकळी प्र.चा. गावात निवडणुकीची सर्वाधिक चुरस दिसून येत आहे. येथे तिरंगी सामना रंगणार असे चित्र असून ७६ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक १० हजार ६३० एवढी या गावची लोकसंख्या आहे. एकूण सहा प्रभागातील १७ जागांसाठी लढती होतील. गत निवडणुकीत माजी नगरसेवक पंडित स्वार, भाजपचे माजी पं.स.सदस्य जगन्नाथ महाजन व राष्ट्रवादीचे सतीश महाजन यांच्या पॕनलला १७ पैकी १२ जागांवर विजय मिळाला होता. प्रतिस्पर्धी खादी ग्रामोद्योग संस्थेचे चेअरमन व पत्रकार किसनराव जोर्वेकर यांच्या पॕनलने पाच जागा राखल्या होत्या. यावेळीही हे घमासान अधिक रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे. सर्वाधिक कमी ८४० एवढी लोकसंख्या चांभार्डी बुद्रूक ची असून येथे सात जागा आहेत. २०११च्या जनगणनेनुसार निवडणुका होत आहे. पिलखोड आणि बहाळमध्येही तुल्यबळ लढतीबहाळ गावची लोकसंख्या कमी असली तरी येथे सहा प्रभागांमध्ये १७ जागांसाठी सामना होतो. गत निवडणुकीत बहाळ ग्रा.पं.वर राष्ट्रवादीने झेंडा रोवला होता. बापू महाजन यांच्या राष्ट्रवादी प्रणित पॕनलला १७ पैकी १२ जागा मिळाल्या होत्या. प्रतिस्पर्धी भाजप पॕनलने पाच जागांवर विजय मिळवला होता. पं.स.च्या माजी सभापती व विद्यमान सदस्या स्मितल बोरसे, दिनेश बोरसे व रमेश महाजन हे भाजप पुरस्कृत पॕनलचे नेतृत्व करतात.पिलखोड ग्रा.पं. गतवेळी भाजपने राखली होती. विद्यमान सरपंच डिगंबर ताथू पाटील व नामदेव सुकदेव बाविस्कर,  बापूराव भानजी बाविस्कर यांच्या भाजप प्रणित पॕनलने राष्ट्रवादीच्या भय्या पांडुरंग शिरसाट प्रणित पॕनलवर विजय मिळविला होता. शिरसाट यांना तीन तर डिगंबर पाटील यांच्या पॕनलला १० जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीचे जि.प. व  जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य भूषण काशिनाथ पाटील यांच्या सायगावातही निवडणुकीसाठी रस्सीखेच आहे. एकूण १५ जागांसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भूषण पाटील हे स्वतंत्र पॕनल सायगावच्या कुरुक्षेत्रावर उतरवत आहे.या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांचा धुरळाकळमडू, भामरे बुद्रूक चांभार्डी बुद्रूक, चांभार्डी खुर्द, हातले, जामडी प्र., बहाळ, रोकडे, वाघले, वाकडी, वाघडू, पिंप्री खुर्द, देवळी, शिंदी, बिलाखेड, अलवाडी, डोणदिगर, तळोंदे प्र.दे., खरजई, टाकळी प्र.चा., दसेगाव, रोहिणी, ओढरे, घोडेगाव, राजदेहरे, हातगाव, पिंपळगाव, तिरपोळे, वरखेडे बुद्रूक, पळासरे, वाघळी, मुंदखेडे खुर्द, मुंदखेडे बुद्रूक, तामसवाडी, तळोंदे प्र.चा., कुंझर, पोहरे, भऊर, जामदा, भवाळी, खडकी बुद्रूक, कोदगाव, पाटणा, दस्केबर्डी, हिंगोणे खुर्द, नांद्रे, मांदुर्णे, पिलखोड, सायगाव, देशमुखवाडी, पिंपळवाड निकुंभ, शिरसगाव, टाकळी प्र.दे. तमगव्हाण, टेकवाडे खुर्द, धामणगाव, भोरस बुद्रूक, बाणगाव, रांजणगाव, बोढरे, बेलदारवाडी, ताबोळे बुद्रूक, पिप्री बुदूक प्र.दे., ब्राम्हणशेवगे, लोंढे, खडकीसीम, गोरखपूर, चितेगाव, जुनोने, बोरखेडे बुद्रूक, रहिपुरी, वडगाव लांबे, तरवाडे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतChalisgaonचाळीसगाव