जळगाव : महिला बेपत्ता झाली त्या दिवसापासून स्वच्छतागृहाकडे कोणी गेलेच नाही का? असा सवाल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित करीत महिला बेपत्ता झाली असताना पोलीस का आले नाही, या बाबतही विचारणा केली. तसेच तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत महिला बेपत्ता असताना रुग्णालयात का शोधले नाही, असा सवाल उपस्थित केला. येथे दोष आहे, म्हणूनच एवढा मोठा गोंधळ झाला, असा ठपकाही ठेवला.वृद्धेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात जाऊन बैठक घेतली. विशेष म्हणजे वृद्धेचा मृतदेह आढळून आल्यानंतर दोन बैठका झाल्या. महिला बेपत्ता झाली त्या वेळी दखल का घेतली गेली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.असाही संशयमृत्यू झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनी मृतदेहाची दुर्गंधी येण्यास सुरूवात होते़ सात नंबरचा वॉर्ड ज्या स्वच्छतागृहात हा मृतदेह आढळला तो नियमित वावर असलेल्या भागात आहे़ अशा स्थितीत आता दुर्गंधी येऊन मृतदेहाचा तपास लागणे म्हणजे केवळ तीन ते चार दिवसांपूर्वीच महिलेचा मृत्यू झाला असेल, सुरूवातीचे काही दिवस महिला बेशुद्धाअवस्थेत असू शकते, असाही एक संशय व्यक्त करण्यात आला आहे़ कदाचित आधीचे दोन दिवस तपास केला असता तर महिला जीवंत आढळून आली असती, अशी शंका नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे़स्वच्छतागृहात कोणी जात आहे का नाही?जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजेच्या सुमारास अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेतली़ यावेळी स्वच्छता कर्मचारी नेमके कोण, स्वच्छतागृहात कोणी जात आहे का नाही? याबद्दल माहिती घेत त्या दिवशी नेमके कोण कर्तव्यावर होते याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. या वेळी परिचारिकांकडूनही माहिती घेण्यात आली़ साधारण अर्धातास ही बैठक झाली़ त्यानंतर पालकमंत्र्यांनी दहा ते पंधरा मिनिटे अधिष्ठाता कार्यालयात सर्व घटना व माहिती जाणून घेतली़कारभाराबाबत जिल्हा प्रशासनाकडून प्रचंड नाराजीकोविड रुग्णालयाच्या कारभाराबाबत जिल्हा प्रशासनाकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनाबाधित वृद्धा बेपत्ता असताना या बाबत जिल्हा प्रशासनाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. तसेच या बाबत केवळ एका पोलीस कर्मचाºयाला दूरध्वनीवरून कळविल्याचे केस पेपरवरून आढळून आले. एवढा गंभीर प्रकार असतानाही प्रमुख याकडे लक्ष देत नसतील तर कारभार कसा चालणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.नावांचाही खेळ१ जून रोजी मालती नेहेते यांची तब्येत खालावल्याने त्यांना भुसावळ येथील रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जळगावच्या कोविड रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. भुसावळ येथून त्यांचे नाव चुकीचे पाठवण्यात आल्याने कोविड रुग्णालयात त्यांच्या नावाची नोंद मालती सुदाणे अशी झाली आहे.
स्वच्छतागृहाकडे कोणी, कधी गेलेच नाही का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:39 AM