दैनिक ‘जनानुनय’च्या कार्यालयातील झाडून सारा कर्मचारी वर्ग हातातली कामं टाकून, त्यांच्या लेखकाच्या अवस्थेचं चाललेलं रसभरीत वर्णन ऐकायला सहाय्यक संपादकांभोवती जमला होता. ‘गझलनुमा रचना’ ‘गझलसद्दश्य रचना’ अशा, अस्सल गझल रचनांचं श्राद्ध घालणाºया रचना वाचून वाचून वैतागलेले, साहित्य पुरवणी विभागाचे प्रमुख तर, एखादा पापनाशक मंत्र श्रद्धेने ऐकावा, तसे कान देऊन ऐकत होते. सहाय्यक संपादक त्यांच्या लेखकावर कोसळलेल्या संकटाचे निवेदन करत म्हणाले,असाच एका हॉटेलातएकटाच होतो बसलो,एक तरुण हसला,मग मीही थोडंसं हसलो.धीटपणे वही काढत म्हणाला,‘सर इथे दाखवू?’मी म्हणालो, ‘अरे, इथे नको,नंतर सावकाश बघू’.नंतर पेट्रोलपंपावरत्याने मला गाठलंच,पेट्रोल भरताभरता‘शेरा’ंचं आभाळ फाटलंचत्या दिवसापासून स्कूटरथरथर कापत पळते,यंत्र असले तरी तिलाबलात्कारातले कळते.मॅकेनिक म्हणाला,ल्लगाडीतभलतंच काही घडतंय,बंद केल्यावरही इंजिनबघाना कसं धडधडतंय.परवा एका स्रेह्याच्याप्रेतयात्रेला होतो गेलो,खांदा देताच तो पुटपुटला,‘मी पूर्ण नाहीये हं मेलो.’तिरडवरची त्याची मानहळूच माझ्या कडे वाकली,ताजी गझल ऐकवून मगचत्याने मान टाकली.पिंडाला कावळा शिवेना,म्हणून पोरगा कावला,‘गझलसंग्रह काढीन.’ म्हणताचपिंडाला कावळा शिवला.रानात कुठल्याही दगडाखालूनएकतरी विंचू निघतोच.तसा प्रत्येक गल्लीमधेएक गझलीया असतोच..फाशीपेक्षा कठोर शिक्षाजेव्हा अतिरेक्यांना देतात,तेव्हा म्हणे फेसबुकवरच्यागझला वाचायला देतात.भिकार गझल रचनेला जोभरभरून दाद देतो,चित्रगुप्त म्हणे त्याची जागानरकात राखून ठेवतो.जेवायला बसलो, घास घेणार,तेवढ्यात फोन आला,शब्दांच्या ऐवजी तिकडून गरमलाव्हाच ओतला गेला.म्हणाला, ‘माझ्या गझलांचेआत्ताच प्रकाशन झाले,सगळे वक्ते संग्रहाबद्दलखूपच छान छान बोलले.गझल सद्दश्य, गझलनुमाम्हटलंय ना मी,आता सांगा गझलीया म्हणूनकुठे कमी पडतोय मी?तुम्हाला काव्यातलं कळत नाही,एवढं मला कळलंय,प्रकाशनापूर्वीच संग्रहालापहिलं बक्षीस मिळालंय (उत्तरार्ध)
‘हाश्श, हुश्श, गझलसदृष अन् रसभरीत वर्णन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 4:54 PM