जळगाव : रोटरी क्लब जळगावतर्फे तरसोद येथील हातेड नाला खोलीकरण, पाणी आडवा पाणी जिरवा कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष प्रेम कोगटा यांच्या हस्ते नारळ फोडून खोली करणाच्या कामास गुरूवारी सुरूवात झाली.. त्यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जितेंद्र ढाके, डॉ काजल फिरके, योगेश गांधी, डॉ. तुषार फिरके, मोहन कुलकर्णी, प्रवीणचंद्र जंगले, अशोक आहूजा, रणवीरसिंग कलसी, मनोज जोशी, संदीप शर्मा राकेश चव्हाण, स्वाती ढाके ,तरसोद गणपती मंदिराचे विश्वस्त व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
पाणी अडविले जाणार
या प्रकल्पा अंतर्गत अडीच किलोमीटर नाल्याचे खोलीकरण करून करोडो लीटर पाणी अडवून जमिनीत जिरवन्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात तरसोद येथील गणपती मंदिरापासून नॅशनल हायवे क्रमांक सहापर्यंतच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.