कजगाव, ता.भडगाव : जवळच असलेल्या भोरटेक शिवारात हरणांनी पिके फस्त करीत अनेक शेतकºयांचे मोठे नुकसान केले आहे. वनविभागाने याची दखल घेत हरणांचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे. अशा प्रकारच्या घटना सध्या रोजच्या घडत असून कमी-अधिक प्रमाणात शेतकºयांचे नुकसान होत आहे. नुकतेच अशोक माणिकराव देशमुख यांचे मक्याचे पीक हरणांनी मोठ्या प्रमणावर फस्त केले आहे. त्यांनी आपल्या शेतात दोन हेक्टर क्षेत्रात रब्बी मक्याची पेरणी केली होती. जोमदार वाढलेल्या या पिकावर हरणाच्या कळपाने झडप घालत लागवड केलेला बहुतांश मका फस्त केला. या घटनेबाबत अशोक देशमुख यांनी चाळीसगाव वनविभागाकडे रितसर तक्रार केली आहे. शेतकरी झाले हैराणगेल्या दोन- तीन वर्षात पाण्याअभावी पिके घेता आली नाही, तर पाणी असताना विजेच्या टंचाईवर मात करीत पिके मोठ्या मेहनतीने शेतकरी वाढवत असताना भोरटेक व परिसरात हरीण व इतर जंगली प्राण्यांकडून पिकांचे नुकसान कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे. याकडे लक्ष देऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
शेतांमध्ये हरणांचा धुमाकूळ
By admin | Published: February 11, 2017 12:13 AM