डी. बी. पाटीलयावल : येथील कोर्ट रस्त्यावरील व गजबजलेल्या वस्तीत असलेल्या बाजीराव काशिदास कवडीवाले यांचे ज्वेलरी दुकानात बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत दुकानातील शोकेस फोडून सोन्याचे दागिने लुटले आहेत. दुकानातून किती माल लंपास केला याबाबत अद्याप अधिकृत आकडा समजू शकला नाही. शिवसेनेचे शहराध्यक्ष तथा ज्वेलरी दुकानाचे संचालक जगदीश कवडीवाले हे बुधवारी दुपारी दुकानात होते. तेव्हा २० ते २५ वयोगटातील चार तरुणांनी दुकानात प्रवेश केला. सुरुवातीला बोटाकडे इशारा करत अंगठी बनवण्याचा इशारा केला व लगेच कवडीवाले यांच्या मानेवर पिस्तोल ठेवत शोकेस फोडून त्यातील सोन्याचा माल लंपास केला.चोरटे दुकानाच्या बाहेर गेल्यानंतर कवडीवाले यांनी आरडा ओरड करताच दुचाकीवर चार जणांनी बसून रस्त्याने पोबारा केला. परिसरातील तरुणांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पसार होण्यात यशस्वी झाले. चोरट्यांनी पिस्तोलमधून हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान रस्त्यावरील दुकानात ही घडली. यामुुळे खळबळ उडाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून भर दुपारी होत असलेल्या या घटनांमुळे तालुक्यात घबराट निर्माण झाली आहे. पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा आरोप व्यापारी व नागरिकांमधून करण्यात येत आहे.
यावलमध्ये भरदिवसा सराफाचे दुकान लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 2:15 PM
दुकानातून किती माल लंपास केला याबाबत अद्याप अधिकृत आकडा समजू शकला नाही.
ठळक मुद्देसराफाच्या मानेवर पिस्तोल लावत फोडले शोकेसशोकेसमधून लांबवले दाागिनेबुधवारी भरदुपारच्या घटनेने खळबळ