जळगाव : चार दिवसापासून नळांना पाणी येत नसल्याने गावाशेजारीच असलेल्या तलावात आंघोळीसाठी गेलेल्या चेतन साहेबराव राठोड (१८) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रामदेववाडी, ता.जळगाव येथे घडली आहे. मृतदेह शोधण्यासाठी महापालिकेचे पथक तसेच रामदेववाडी, शिरसोली, पाथरी, म्हसावद व गालापूर येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदेववाडीसह परिसरातील वावडदा, वडली, जळके येथे बाराही महिने पाणी टंचाई असते. उन्हाळ्यात तीव्र स्वरुपाची पाणी टंचाई जाणवते. रामदेववाडी येथे चार दिवसापासून नळांना पाणी येत नसल्याने गावातील तरुण तलावात आंघोळीसाठी जातात. शनिवारी चेतन साहेबराव राठोड, नवल पांडूरंग राठोड व सागर धनराज राठोड असे तिघं जण तलावात आंघोळीसाठी गेले. त्यावेळी चेतन आंघोळीसाठी उतरला. पोहता येत नसल्याने तो खोल खड्डयात गेला अन् जीव वाचविण्यासाठी आरडाओरड करायला लागला. हा प्रकार पाहून सागर व नवल दोघं जण मदतीला धावले, त्याशिवाय तलावाच्या दुसºया काठावर मासेमारी करीत असलेलेल हौसीलाल भोई हे देखील धावून आले. मात्र तलाव खोल व गाळ खूप प्रमाणात असल्याने चेतन हाती लागला नाही. त्यांनी हा प्रकार लागलीच गावात कळविला.
तलावात बुडालेल्या २२ तासानंतर काढला बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 1:20 PM