जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : यंदाच्या दुष्काळात राज्य होरपळून निघत असले तरी राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. १९७२ च्या तुलनेत यावर्षीच्या दुष्काळात पाणी प्रश्न भयावह आहे. आॅक्टोबरपासूनच शासन स्तरावर दुष्काळाला तोंड देण्यासाठी उपाय योजना आखण्यास सुरुवात केली होती. 'मागेल त्याला टँकर, मागेल त्याला चारा छावणी' हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धोरण आहे. राज्यात सद्य:स्थितीत १३०० चारा छावण्या सुरू असून साडे नऊ लाख गुरांचे संगोपन केले जात आहे. पावणेचार लाख लोकांना रोजगार हमी योजनेवर रोजगार उपलब्ध करुन दिला आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शनिवारी त्यांनी चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार उन्मेष पाटील उपस्थित होते.प्रश्न : चारा छावण्या सुरू कराव्यात, असा राज्यभर सूर आहे. याविषयी काय सांगाल?चंद्रकांत पाटील : दुष्काळाबाबत राज्य सरकार अत्यंत संवेदनशील आहे. चारा छावण्या कोण्या व्यक्तीला देता येत नाही. त्यासाठी संस्था पुढे येणे आवश्यक आहे. चारा छावण्यांबाबतच्या अटीदेखील शिथील केल्या आहेत. पूर्वी १० लाख रुपये डिपॉझीट होते. ते आम्ही अवघे एक लाख रुपये केले आहे. केंद्र सरकारकडून चारा छावण्यांसाठी ७० व ३५ रुपये अनुदान दिले जाते. यातही शासनाने वाढ करुन ते १०० व ५० रुपये केले आहे. याचा दरदिवसाला दिडशे कोटीचा वाढीव बोझा राज्य सरकारला द्यावा लागत आहे. राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या मागे ठामपणे उभे आहे.प्रश्न : चाऱ्या समस्येबाबत काय नियोजन केले आहे?चंद्रकांत पाटील : आॅक्टोबरमध्ये पर्जन्यमानाची स्थिती लक्षात घेऊनच आम्ही जनावरांच्या चा-याबाबत नियोजन करायला सुरुवात केली. एक लाख एकर क्षेत्रावर चारा लागवड केली असून शेतक-यांनादेखील लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. सरकारी जमिनी यासाठी एक रुपया लीज भरुन उपलब्ध करुन दिल्या आहेत. जून अखेरपर्यंत चाºयाची टंचाई जाणवणार नाही. अजूनही चारा लागवडीसाठी शेतकरी पुढे आल्यास शासन मदत करेल.प्रश्न : सध्या राज्यभरात किती चारा छावण्या सुरू आहेत?चंद्रकांत पाटील : एकट्या बीड जिल्ह्यात ६०० तर संपूर्ण राज्यात एकूण १३०० चारा छावण्या राज्य सरकारने सुरु केल्या आहेत. यात साडे नऊ लाख गुरांचे संगोपन केले जात असून जनावरांची पूर्ण निगाही राखली जात आहे. प्रत्येक गुराला दरदिवशी १८ किलो चारा आणि एक किलो पेंड खाण्यासाठी देण्यात येते. जळगाव जिल्ह्यातही मागणी पुढे आल्यास चारा छावण्या सुरु केल्या जातील.प्रश्न : जळगाव जिल्हा जलव्यवस्थापनाच्या तीन सभा तहकुब झाल्या. काय सांगाल?चंद्रकांत पाटील : जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आहे. अध्यक्षांविना जलव्यवस्थापनाच्या सभा तहकूब होत असतील तर हे चुकीचे आहे. याविषयी जि.प.अध्यक्ष उज्वला पाटील यांच्याकडून माहिती घेऊन योग्य त्या सूचना दिल्या जातील.प्रश्न : पिण्याच्या पाण्याची काय स्थिती आहे ?चंद्रकांत पाटील : राज्यातील पाणी प्रश्न गंभीर आहे. मे मध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य असले की, आपण पाणी टंचाईच्या नावाने शंखनाद करतो. १५ जूनला पावसाचे आगमन वेळेवर झाले तर आपल्याला दुष्काळाचा विसरही पडतो. यंदा मात्र हवामानाच्या अंदाजानुसार पाऊस चांगला पडणार असला तरी तो उशिरा येणार आहे. त्यामुळे आहेत ते जलसाठे जपून वापरावे लागणार आहे. जिथे जुलै मध्ये पाऊस पोहचतो. अशा तालुकांमध्ये जास्तीची काळजी घ्यावी लागेल. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या योजना पूर्ण करण्यासह पाणी साठविणे आणि जमिनीत पाणी जिरवणे. अशी कामे हाती घेणे गरजेचे आहे.प्रश्न : राज्यात लोकसभेच्या भाजपाला किती जागा मिळतील ?चंद्रकांत पाटील: पश्चिम महाराष्ट्रातील १०च्या दहा जगा एनडीएला मिळतील. राज्यात महायुतीला ४४ जागांवर विजय मिळेल. देशात भाजपाला २९० जागा मिळतील. याबाबत आपण कुणाशीही पैज लावायला तयार आहोत. हवे तर को-या कागदावरही लिहून देतो.प्रश्न : मराठा आरक्षण आणि वैद्यकीय प्रवेश तिढा कसा सोडविणार ?चंद्रकांत पाटील : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश घेणाºया मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा. उपोषण मागे घ्यावे. शनिवार व रविवार सुट्टी असल्याने संकेतस्थळावर माहिती टाकणे चुकीचे आहे. शुक्रवारी राज्यपाल हैद्राबाद येथे गेले होते. अध्यादेशावर त्यांची स्वाक्षरी होऊन त्यानंतर मुख्य सचीव आणि मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होईल. त्याचे गॅझेट प्रसिद्ध केले जाते. गॅझेट हे सरकारच्या छापखान्यातच छापले जाते. रविवारी सुटी असल्याने सोमवारी ते प्रसिद्ध केले जाईल. खुल्या प्रवगार्तील विद्यार्थ्यांवरही अन्याय होऊ देणार नाही. या विद्यार्थ्यांनी खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्यास त्याची फी राज्य सरकार भरेल. अध्यादेशाला आव्हान मिळू नये म्हणून राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयासह औरंगाबाद व नागपूर खंडपीठ, सर्वोच्च न्यालयात कॅव्हेट दाखल केला आहे.प्रश्न : राज ठाकरे यांनी दुष्काळ 'दौरे दिखाऊ' असल्याचे म्हटले आहे. काय सांगाल ?चंद्रकांत पाटील : राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहे. त्यांच्या हातात लाल पेन्सिल आहे. कागदावर दहा चांगल्या गोष्टी असताना त्यातील एखाद्या उणीवेवरच ते लाल रेघ मारतात. त्यांनी कागदावरील इतर चांगल्या गोष्टीही बघाव्यात.'
मागेल त्याला ‘टँकर’, मागेल त्याला चारा छावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 3:08 PM
यंदाच्या दुष्काळात राज्य होरपळून निघत असले तरी राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. १९७२ च्या तुलनेत यावर्षीच्या दुष्काळात पाणी प्रश्न भयावह आहे. आॅक्टोबरपासूनच शासन स्तरावर दुष्काळाला तोंड देण्यासाठी उपाय योजना आखण्यास सुरुवात केली होती. 'मागेल त्याला टँकर, मागेल त्याला चारा छावणी' हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धोरण आहे. राज्यात सद्य:स्थितीत १३०० चारा छावण्या सुरू असून साडे नऊ लाख गुरांचे संगोपन केले जात आहे. पावणेचार लाख लोकांना रोजगार हमी योजनेवर रोजगार उपलब्ध करुन दिला आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ठळक मुद्देराज्यात १३०० चारा छावण्यांमध्ये साडे नऊ लाख गुरे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती