शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

‘सुपरफास्ट’ रस्ता ठरतोय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 10:46 PM

चाळीसगाव येथील भडगाव रोडवरील स्थिती : स्पीडब्रेकर नसल्याने दरदिवशी अपघात, नागरिक उभारणार आंदोलन

चाळीसगाव : बहुतांशीवेळा खराब आणि खड्डेमय रस्त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असतात. चकाचक आणि सुपरफास्ट रस्त्याविषयी नागरिकांना हायसे वाटते. मात्र, चुकीच्या नियोजनामुळे रस्ता सुफरफास्ट असूनही तो डोकेदुखी कसा ठरतो, हे भडगाव रोडवरील वाढते अपघात पाहता सहज लक्षात येते. हा रस्ता जळगाव - चांदवड महामार्गावर असल्याने त्याचे काम पूर्ण होत आहे. ठिकठिकाणी स्पीडब्रेकर नसल्याने दरदिवशी रहदारी व वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरु झाली आहे. तातडीने स्पीडब्रेकर टाकावेत, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.जळगाव - चांदडवड मार्ग चाळीसगाव शहरातून जातो. भडगाव रोडमार्गे त्याचा शहरात प्रवेश होतो. खरजई नाका ते सिग्नल चौक हा प्रचंड वर्दळीचा व रहदारीचा भाग असून येथे मोठा रहिवासही आहे. साहजिकच रस्त्यावर नेहमीच पादचारी, सायलस्वार यांचीही गर्दी मोठी असते.रस्त्याचे दुपदरीकरण लवकरच पूर्ण होऊ घातले आहे. किरकोळ कामे वगळता शहरातर्गत ९० टक्के रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. रस्ता चकाचक आणि सुपरफास्ट झाला असताना तो नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरतो आहे. नव्याने रस्ता तयार करताना त्यावर जुन्या रस्त्यानुसार ठिकठिकाणी स्पीडब्रेकर टाकणे गरजेचे होते. परंतु, मागणी करुनही स्पीडब्रेकर टाकले न गेल्याने नागरिक व रहिवासी संतप्त आहेत.नागरिाकंची मोठी वर्दळखरजई नाका ते सिग्नल चौक या भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते. याच भागात प्राथमिक व माध्यमिक शाळा, बँक, एलआयसी कार्यालय, पाच मंगल कार्यालय, बँकांचे एटीएम, चार पेट्रोलपंप, अंधशाळा, मुला - मुलींचे वसतिगृह, चार चौक, खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांची जनसंपर्क कार्यालये, अशी नागरिकांची मोठी वर्दळ असणारी गर्दीची ठिकाणे आहेत. 

डॉ. पूर्णपात्रे माध्य. विद्यालय, वाणी मंगल कार्यालय, कापड गिरणी, कॅप्टन कॉर्नर, अंधशाळा चौक, बसस्थानक, एलआयसी कार्यालय, खरजई नाका आदि ठिकाणी तातडीने स्पीडब्रेकर टाकणे आवश्यक व गरजेचेही आहे. डॉ. पूर्णपात्रे शाळेजवळ सकाळी, दुपारी आणि सायंकाळी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. यामुळे येथे स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक लावणे क्रमप्राप्त आहे. स्पीड ब्रेकर न टाकल्यास या भागात मोठे अपघात होऊन जीवितहानी देखील होऊ शकते. असे प्रसंग घडल्यास नागरिकांच्या संतापाचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे. तातडीने दखल घ्यावी. अशी मागणी जोर धरत आहे. विवाह सोहळ्यांची लगबग असल्याने मंगल कार्यालये गदीर्ने ओंसाडून वाहत आहेत. रस्त्यावर कुठेही 'दिशादर्शक व इतर माहिती' देणारे फलक लावलेले नाहीत. शाळेत जाणा-या दोन ते अडीच हजार विद्यार्थी व पालकांची वर्दळ असते. काही विद्यार्थी सायकलवर तर काही विद्यार्थी बस व आ?टोरिक्षाने शाळांमध्ये येतात. अशावेळी सुसाट रस्त्यावरुन भरधाव वेगाने येणारी वाहने अपघातास निमंत्रण देणारी ठरत आहे.