जळगाव : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, तंत्र शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक जिल्ह्यातील स्कूल कनेक्ट उपक्रम राबविण्यात येत आहे़ त्यातंर्गत प़ ऩ लुंकड कन्या शाळा येथे नुकतीच मुख्याध्यापकांची बैठक पार पडली़सुनीता लांडगे यांनी प्रास्ताविक केले़ प्रा़ दी़ म़ पाटील यांनी पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया, प्रा़ ए़ एस़ झोपे यांनी पदविका अभ्यासक्रम कशा पध्दतीने इतर अभ्यासक्रमापेक्षा किफायतशीर आहे हे सांगितले़ प्रा़ डॉ़ आशिष विखार यांनी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या नोकºयासंबंधी माहिती दिली़ प्रा़ के़ एम़ ठाकूर यांनी आभार मानले़ उपक्रमातंर्गत चाळीसगाव, भुसावळ, जामनरे, अमळनेर, मुक्ताईनगर, रावेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल आदी ठिकाणी मुख्याध्यापकांच्या सभा घेण्याचे सांगण्यात आले.
‘स्कूल कनेक्ट’ अंतर्गत मुख्याध्यापकांची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:25 PM