जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शुक्रवारी (दि.१) शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य जागरूकता शिबिर घेण्यात आले.
संगणकशास्त्र प्रशाळा आणि सामाजिकशास्त्र प्रशाळेअंतर्गत प्रा. मनीष जोशी आणि डॉ. प्रशांत सोनवणे यांना उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर होणाऱ्या ताण-तणावाच्या परिणामांचे परीक्षण आणि व्यवस्थापन करणे या शिर्षकाखाली दीर्घ संशोधन प्रकल्प मिळाला आहे. त्या प्रकल्पांतर्गत संगणकशात्र व सामाजिकशास्त्र प्रशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य जागरूकता शिबिर घेण्यात आले. यामध्ये शारीरिक व मानसिक ताण-तणाव संदर्भात माहिती संकलनासाठी शारीरिक सेन्सर व ऑनलाइन प्रश्नावलीद्वारे तपासणी करून व्यक्तिमत्व प्रकार व तणावाची पातळी काढण्यात आली. या शिबिरास संगणकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. एस. आर. कोल्हे, प्रकल्प संचालक प्रा. मनीष जोशी व डॉ. प्रशांत सोनवणे उपस्थित होते.