या आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रशांत पाटील, डॉ. पूनम पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. नीळकंठ पाटील, डॉ. तौसिफ खाटीक, डॉ. प्रफुल्ल काबरा, प्राचार्य आर. आर. वळखंडे, डॉ. टी. एन. भोसले, डॉ. एस. वाय. पाटील, सरपंच उज्ज्वला पाटील, उपसरपंच डॉ. रावसाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील, विष्णू भोसले उपस्थित होते. कर्मवीर हरी रावजी पाटील यांच्या विसाव्या पुण्यस्मरणार्थ व प्रतापराव हरी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी वृंदावन हॉस्पिटल पाचोरा यांच्यातर्फे पाचशे नीडल व गोळ्या भेट देण्यात आल्या. या शिबिराला अंतर्गत पोटाचे विकार अपेंडिक्स हार्निया हायड्रोसिल अशा विविध आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच शरीरावरील सर्व प्रकारचे गाठी व हाडांच्या सर्व प्रकारचे आजार ऑपरेशन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरअंतर्गत ४१५ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. सूत्रसंचालन एस. पी. पाटील यांनी केले. शिबिर यशस्वितेसाठी साधनाई फाउंडेशनचे कार्यकर्ते हरीश भोसले, दीपक भोसले, नितीन पाटील यांनी परिश्रम घेतले.
आमडदे येथे साधनाई फाउंडेशनअंतर्गत आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:17 AM