शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जळगाव जिल्ह्यात शालेय विद्याथ्र्याची आरोग्य तपासणी ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:21 PM

निविदा रखडल्या : राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गतची वाहने थांबली

ठळक मुद्देनिविदा न काढल्याने अडचणशासनाच्या पत्राने संभ्रमपथक बसून 

ऑनलाईन लोकमत / विजयकुमार सैतवाल

जळगाव, दि. 2 - राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय विद्याथ्र्याच्या आरोग्य तपासणीसाठी असलेल्या पथकांच्या वाहनांची  निविदा प्रक्रिया रखडल्याने वाहनांअभावी 1 सप्टेंबरपासून शालेय आरोग्य तपासणी ठप्प झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील जवळपास चाळीस पथकातील 160 कर्मचारीही बसून आहेत. दरम्यान, सोमवार, 4 सप्टेंबर्पयत सर्व सुरळीत होईल, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र सरकारच्यावतीने अंगणवाडी, शाळा, आश्रमशाळांमधील 16 वर्षे वयोगटार्पयतच्या विद्याथ्र्यांच्या आरोग्य तपासणीसाठी राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविला जातो. यासाठी केंद्र सरकारकडून स्वतंत्र निधीही उपलब्ध केला जातो. यामध्ये विद्याथ्र्याच्या आरोग्य तपासणीसाठी प्रत्येकी एक पुरुष व महिला डॉक्टर, एक फार्मासिस्ट व एक परिचारिका असे चार जणांचे पथक असते व त्यांना यासाठी वाहन दिले जाते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात 40 पथक आहे. 

या पथकाला देण्यात येणारे वाहन कंत्राटी पद्धतीवर लावले जातात. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात लावण्यात आलेल्या वाहनांचा कंत्राट एप्रिल महिन्यातच संपला. मात्र निविदा न काढल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ती मुदतदेखील 31 ऑगस्ट रोजी संपली. 31 ऑगस्ट रोजी वाहनांच्या कंत्राटाची मुदत संपली. 1 सप्टेंबरपासून वाहनांअभावी पथक जिल्ह्यात कोठेच जाऊ शकले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शालेय विद्याथ्र्याची आरोग्य तपासणी ठप्प तर झालीच सोबतच केंद्र सरकारकडून मिळणा:या निधीतून पथकाला दिला जाणा:या पगाराची रक्कमही वाया जाण्याची चिन्हे आहेत. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण समितीच्या नियंत्रणाखाली हा उपक्रम राबविला जातो व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात.  एप्रिल महिन्यात वाहनांच्या कंत्राटाची मुदत संपल्यानंतर या संदर्भात स्थानिक पातळीवर काढण्यात येणा:या निविदा न काढण्याचे पत्र शासनाने काढले. त्यामुळे निविदा निघू शकल्या नाही. त्यांनतर 19 ऑगस्ट रोजी शासनाने पुन्हा निविदा काढण्यासंदर्भात परिपत्रक काढले.   मात्र ते ऑनलाईन असल्याने त्यावर संबंधितांची सही नव्हती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिका:यांनी ही प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे मुदत संपत आली असतानादेखील निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अखेर 1 सप्टेंबर रोजी पथकाला वाहने मिळू शकली नाही. 

वाहनांचा जुना कंत्राट संपला आहे. आज निविदा उघडण्यात येत असून दोन ते तीन दिवसात सर्व सुरळीत होईल. - कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. 

अगोदरच्या कंत्राटदाराला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. आता ते दर वाढवून मागत होते. मात्र ते शक्य नाही.  31 रोजी त्यांचा कंत्राट संपला असून आज नवीन निविदा उघडण्यात आल्या. सोमवार्पयत सर्व सुरळीत होईल.- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.