जळगाव : मनपा सफाई कर्मचारी कामावर हजर नसतानाही त्या कर्मचाऱ्यांची हजेरी लावल्याप्रकरणी मनपा आरोग्य निरीक्षक सतीष करोसिया यांचे निलंबन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी यासंबधी बुधवारी आदेश काढले आहेत.वॉटरग्रेस कंपनीकडून काम काढून घेतल्यानंतर सध्या पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी मक्तेदाराकडे सफाईचे काम देण्यात आले आहे. मात्र, हे काम कररत असताना अनेक कर्मचारी कामावर हजर नसतानाही त्यांची हजेरी लावून त्यांचे दररोजचे वेतन काढले जात असल्याची तक्रार उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे व भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली होती. याबाबत मुख्य लेखा परीक्षक व तथा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी चौकशी केली. तसेच याबाबत आरोग्य निरीक्षक सतीश करोसिया यांना २० एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, निर्धारित वेळेत करोसिया यांनी सादर केला नव्हता.अहवाल ऐवजी सादर केली टीपणीआरोग्य निरीक्षकाने अहवालाऐवजी उपायुक्तांकडे टीपणी सादर केली. यामध्ये त्यांनी अहवाल साहाय्यक आयुक्तांकडे सादर केल्याचे म्हटले होते. या अहवालात गैरहजेरीबाबतदेखील कळविले असल्याचे म्हटले होते. मात्र, साहाय्यक आयुक्तांना असा कोणताही अहवाल प्राप्त झाला नसल्याचे उपायुक्तांनी केलेल्या चौकशीत आढळून आले.मस्टरवर खाडाखोडदरम्यान, १४ एप्रिल रोजी ४१ कर्मचाऱ्यांची हजेरी संबंधित आरोग्य निरीक्षकाने लावली होती. उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, केवळ २५ कर्मचारी कामावर हजर होते. तसेच मस्टरवर व्हाईटनरने खाडाखोड केली असल्याचे आढळून आले होते.त्यामुळे या प्रकरणी आरोग्य निरीक्षकाचे निलंबनाचे आदेश बुधवारी उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिले आहेत. दरम्यान, भविष्यात असे कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नसून, याबाबत कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी ‘लोकमत’ ला दिली.कारवाई टाळण्यासाठी पदाधिकाºयांची धावपळसंबधित आरोग्य निरीक्षकावर मनपा प्रशासनाने निलंबनाची कारवाई केल्यानंतर राजकीय दबावतंत्र सुरु झाले. सत्ताधारी भाजपच्या काही पदाधिकाºयांनी आयुक्त व उपायुक्तांना फोन करून ही कारवाई रोखण्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. एकीकडे स्वच्छतेच्या समस्यांबाबत टीका करायची आणि या कामांमध्ये चुका करणाºयांचा बचाव करण्यासाठीच सत्ताधारी भाजपच्याच पदाधिकाºयांनी प्रयत्न करायचे असे प्रकार घडत असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
चुकीची हजेरी लावणारा आरोग्य निरीक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:58 AM