मुक्ताईनगर, जि.जळगाव : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी रात्री संत मुक्ताबाई पालखीच्या मुख्य समाधीस्थळी पालखीचे कोथळी येथे दर्शन घेतले.कोरोना महामारी निर्मूलनासाठी राज्यभरात अत्यंत व्यस्त असतानासुध्दा आरोग्यमंत्र्यांनी आपल्या पाथरवाला बुद्रूक या गांवी परंपरेने येत असलेल्या संत मुक्ताबाई पालखीची आठवण काढत जळगाव जिल्ह्यातील दौऱ्यात संत मुक्ताबाईचे दर्शन घेतले.या वेळी संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रवींंद्र महाराज हरणे, मंदिर व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील विनोद तराळ, ईश्वर राहणे, वाहीदखान पठाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव सम्राट पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, हभप. विशाल महाराज खोले, सचिन चौधरी, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आत्माराम जाधव, आसिफ खान इस्माईल खान शहीद खान, तहसीलदार श्याम वाडकर, नायब तहसीलदार प्रदिप झांबरे, ग्रामसेवक मनोहर रोकडे उपस्थित होते.
आरोग्य मंत्र्यांनी घेतले मुक्ताई पालखीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 6:08 PM