जळगाव : जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकडून होणाऱ्या कीटकनाशकांचा वापर तसेच त्याचे दुष्परिणाम व आवश्यक ते उपचार याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टरांनी सजग रहावे जेणेकरून कीटकनाशकापासून विषबाधा, दुर्घटना टळू शकतील, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी केले.
कृषी आयुक्तालय, कृषी विभाग पुणे, क्रॉप लाइफ इंडिया व शिवार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पहिलीच कीटकनाशकापासून पासून दुष्परिणाम टाळण्यासाठी दक्षता उपचार व्यवस्थापन याबाबत जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्यशाळा ऑनलाइन घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, डॉ. बी. टी. जमादार, डॉ. जयप्रकाश रामानंद, एस. के. ठाकूर, अनिल भोकरे डॉ. चौधरी, अस्तित्व सेन, सुशील देसाई आदी उपस्थित होते.
कीटकनाशकांमुळे जगात दरवर्षी दोन लाख बळी
कीटकनाशके किंवा तत्सम विविध रसायनांच्या वापरामुळे जगात दरवर्षी दोन लाख मृत्यू होत असल्याची नोंद आहे, असे डॉ. देवव्रत कानुंगो यांनी यावेळी सांगितले कार्यशाळेत सांगितले. कीटकनाशकांचे तात्कालिक तसेच दीर्घकालीन दुष्परिणाम ही होत असतात. त्यामुळे सर्वांनीच पुरेशी काळजी घेतली गेली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.