जामनेर: जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार घेण्यात आलेली संशयित रुग्ण शोध मोहीम तालुक्यात जोरदार सुरु आहे. या मोहिमेत आतापर्यंत १५७ गावांमधील ४५ हजार ६१५ घरात तर शहरातील ८ हजार ४३५ घरात आरोग्य विभाग पोहचला आहे. यातील २ लाख ६० हजार लोकांची माहिती घेतली व लक्षणे असणाऱ्यांची तपासणीही झालीतालुक्यातील पळासखेडा बुद्रुक येथे १९ मे रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता त्यानंतर आतापर्यंत ही संख्या ५७३ पर्यंत पोहचली आहे पैकी ३४६ कोरोनामुक्त झाले असून ३० जणांचा मृत्यूही झाला आहे. ज्या गावात रुग्ण आढळला तेथे किंवा संबंधित परिसरात अवघ्या काही तासांत कंटेनमेंट झोन घोषित करणेबाबत आदेश काढला जातो त्यानंतर आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्या भागातील प्रत्येक घरातील प्रत्येकाची माहिती घेण्यासाठी विशेष सर्वेक्षण राबविले जाते. कोणाला काही त्रास आहे का? कोरोनाची लक्षणे जाणवतात का? अशी माहिती घेतली जाते. थोडाही संशय आला तरी वैद्यकीय अधिकारी तात्काळ जावुन तपासणी करतात. जास्त जोखमीचे वाटल्यास त्याला स्वॅब घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय पाठविले जाते. अशी ही प्रक्रिया चार महिन्यांपासून सुरू आहे.वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, तहसीलदार अरुण शेवाळे, मुख्याधिकारी राहुल पाटील, डॉ.हर्षल चांदा, डॉ. आर.के.पाटील, डॉ. प्रशांत महाजन, डॉ. जयश्री पाटील, गट विकास अधिकारी एन. आर. पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी ईश्वर गोयर व पदम परदेशी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, नगरपालिका कर्मचारी, सरपंच, पोलीस पाटील आदी यासाठी परिश्रम घेत आहेत.३१०० स्वॅबची तपासणी....आतापर्यंत तालुक्यात ३ हजार १०० स्वॅबची तपासणी झाली आहे, पैकी २५५० अवाहल निगेटिव्ह आले असून ५७३ पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच २५०० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.रुग्ण पॉझिटिव्ह आढळताच संबंधित परीसर अथवा गावात कंटेनमेंट झोन घोषित केला जातो त्यानंतर लगेच सर्वेक्षण केले जाते यासाठी यंत्रणा परिश्रम घेत आहे संशयितांची तपासणी करुण त्यांचा स्वॅब घेतला जातो.-डॉ. राजेश सोनवणेतालुका वैद्यकीय अधिकारी जामनेरफोटो कैप्शन : तालुक्यातील गावांमध्ये आरोग्य कर्मचारी व अगणवाड़ी सेविका घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करीत असताना.
जामनेर तालुक्यात ५४ हजार घरांपर्यंत पोहचले आरोग्य कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 4:44 PM