जळगाव- स्वागत समारंभाचा कार्यक्रम (रिसेप्शन) आटोपून घराकडे येत असताना वºहाडाच्या कुटूंबीयांवर सोमवारी पहाटे काळाने घाला घातला़ समोरून भरधाव येणाऱ्या डंपरने क्रुझरला जोरदार धडक दिल्यानंतर १० जण जागीच ठार झाले तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ हा अपघात यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ घडली़ या दुर्देवी घटनेने चिंचोल, निंबोल आणि चांगदेव गावामध्ये शोककळा पसरली आहे.रविवारी रात्री मुलीचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम झाल्यानंतर चोपडा येथून चिंचोल, चांगदेव तसेच निंबोल येथील वºहाडीतील कुटूंबीय कु्रझरने (क्ऱ एम.एच.१९सी.व्ही.१७७२) घराकडे निघाले़ दरम्यान, सोमवारी पहाटेच्या सुमारास राखेने भरलेले डंपर (क्र. एम.एच.४०एन ७७५८) महामार्गावरून भरधाव जात असताना त्या डंपरने यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ वºहाडी कुटूंबीय घेवून जाणाºया क्रुझर या चारचाकीला समोरून जोरदार धडक दिली़ अपघात एवढा भिषण होता की क्रूझरमधील १७ पैकी १० जण जागीच ठार झाले.ग्रामस्थांसह पोलिसांची घटनास्थळी धावहिंगोणा गावाजवळ मोठा अपघात झाल्याची माहिती कळताच हिंगोणा ग्रामस्थांसह पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे,सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखेडे, जिजाबराव पाटील, रोहिदास ठोंबरे व सहकारी पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले़ अपघात झाल्यानंतर दोन्ही कडील थांबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.चालक अडकला वाहनातया अपघातात क्रूझर चालक धनराज गंभीर कोळी हा वाहनामध्ये अडकून पडला होता़ त्याला अथक परिश्रमानंतर बाहेर काढण्यात आले़ दरम्यान अपघात झाल्यानंतर सहा मृतदेह हे यावल ग्रामीण रुग्णालय हलविण्यात आले़ उर्वरित चार मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.डंपर चालकाला घेतले ताब्यातदरम्यान, अपघातील जखमींना भुसावळ, सावदा,जळगाव येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते़ अपघाताची नोंद फैजपूर पोलीस स्टेशन करण्यांत आहे़ यातील डपर चालक मुकुंदा गणेश भंगाळे याला ताब्यात घेण्यात आले आहे़ दरम्यान अपघाताचे वृत्त कळताच सकाळी ग्रामीण रुग्णालय यावल येथे आ.शिरीष चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आ.हरीभाऊ जावळे यांनी तात्काळ भेटी दिल्या.क्रुझरचा चक्काचुरडंपर आणि क्रुझरचा अपघात एवढा भिषण होता़ की क्रुझरचा चक्काचुर झाला़ तर डंपर हा रस्त्याच्या कडेला खड्डयात जावून कोसळला़ त्यामुळे घटनास्थळी प्रचंड नागरिकांची गर्दी झालेली होती.असे आहेत अपघातातील मृतमंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (६५), प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी ( ६०) ,प्रभाबाई प्रभाकर चौधरी (४०), आश्लेषा उमेश चौधरी (२८), रिया जितेंद्र चौधरी (२१), सोनाली जितेंद्र चौधरी (३४), प्रियंका नितीन चौधरी (२९, रा़ चिंचोल ता़ मुक्ताईनगर), सोनाली सचिन महाजन (३४), सुमनबाई श्रीराम पाटील (५५,रा निंबोल ता.रावेर), संगीता मुकेश पाटील (४०,रा.निंबोल ता.रावेर) असे हे दहा जण जागीच ठार झाले़यांचा उपचारादरम्यान मृत्यूक्रुझरमध्ये अडकलेला चालक धनराज तायडे याला त्वरित उपचारार्थ रूग्णालयात हलविण्यात आले होते़ तर त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे़ तर शिवम प्रभाकर चौधरी (१९, रा़ चिंचोल) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ त्यामुळे अपघातातील मृत्यांची संख्या १२ झाली असून चिंचोल, चांगदेव व निंबोल गावामध्ये शोककळा पसरली आहे.हे आहेत जमखीसर्वेश नितीन चौधरी (९), आदिती मुकेश पाटील (१४, रा.निंबोल), सुनिता राजाराम पाटील (४५ रा.चिंचोल), मीना प्रफुल चौधरी (३० रा.चिंचोल ता.मुक्ताईनगर), डंपर चालक मुकुंदा गणेश भंगाळे (रा.डाभुर्णी ता.यावल) हे जखमी आहेत.जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची गर्दीजळगाव जिल्हा रूग्णालयात सोमवारी सकाळी अपघातानंतर प्रिंयका नितीन चौधरी, सुमनबाई श्रीराम पाटील, संगिता मुकेश पाटील, रिया जितेंद्र चौधरी यांचे मृतदेह आणण्यात आले होते़ त्यानंतर दुपारी क्रुझर चालक धनराज तायडे व शिवम प्रभाकर चौधरी या दोघांचे मृतदेह शववाहिकेतून आणले होते़ त्यामुळे रूग्णालयात नातेवाईकांची सकाळपासून गर्दी झालेली होती़ तर या सहा जणांवर जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले़ यावेळी नातेवाईकांकडून प्रचंड आक्रोश करण्यात येत होता.