भुसावळ विभागात जोरदार पाऊस, पिकांना जीवदान
By admin | Published: July 13, 2017 1:12 PM
पावसामुळे भुसावळ विभागातील पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
ऑनलाईन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. 13 - भुसावळसह विभागातील रावेर, यावल, मुक्ताईनगर आणि बोदवड येथे आज पहाटे 2 वाजेपासून जोरदार पाऊस झाला. हा पाऊस सकाळी 7 वाजेर्पयत पाऊस सुरू होता. या पावसामुळे भुसावळ विभागातील पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 24.4 मी.मी.पाऊसभुसावळसह विभागात रात्री जोरदार पाऊस झाला. सर्वत्र पाणी साचले. वातावरणात गारवा पसरला. पिकांना जीवदान मिळाले. गुरुवारी सकाळी 8 वाजे र्पयत भुसावळात 24.5 मी.मी.पाऊस झाल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयातून देण्यात आली. यावल तालुक्यात यावल, किनगाव, साकळी, भालोद, बामणोद, फैजपूर या ठिकाणी पाऊस मोजला जातो.