भुसावळ, जि.जळगाव : नाशिक विभागात 'अ' दर्जा प्राप्त असलेली नगरपालिका सध्या सर्व बाबतीत समस्यांचा माहेरघर झाली आहे. पहिल्याच पावसात भुसावळच्या खड्डेमय रस्त्यांची बिकट अवस्था झाली असून, त्यात पाणी साचले असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली.शहरात अनेक समस्यांनी घेरले आहे. त्यात कोरोना महामारीची समस्या ज्वलंत आहे. याशिवाय अशुद्ध पाणीपुरवठा, खड्डेमय रस्ते, नाल्यांची साफसफाई नाही. सर्वच बाबतीत भुसावळकरांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. पहिल्याच पावसात भुसावळातील खड्डेमय रस्त्यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड््यांचा अंदाज न आल्यामुळे वाहने खड्ड््यांमधून मार्गस्थ करावी लागले. तसेच बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर काही दिवसांपूर्वी जलवाहिनी टाकण्यात आली होती. या ठिकाणी संपूर्ण चिखलमय रस्ता झाला असून या रेल्वे बोगद्या खालून जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो.संपूर्ण रस्ते चिखलमय झाल्यामुळे भुसावळकरांच्या अडचणी वाढल्या आहे.एकंदरीत, पहिल्या पावसातच भुसावळकरांची तारांबळ उडाली. त्यातल्या त्यात विजेचा लपंडाव दिवसभर सुरू होता.
भुसावळला धुवाधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 3:26 PM
पहिल्याच पावसात भुसावळच्या खड्डेमय रस्त्यांची बिकट अवस्था झाली.
ठळक मुद्देखड्डेमय रस्त्यात साचले पाणीवाहन चालकांची उडाली तारांबळ