ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.1- अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव शहरासह भुसावळात शनिवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. समाधानकारक पाऊस झाल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला.
जळगाव शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी 12 वाजेच्या सुमारास हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरु झाला. पावसामुळे औद्योगिक वसाहतीतील सखल भागात पाणी साचले होते. हा पाऊस पिकांसाठी जीवनदान देणारा असल्याने शेतक:यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
भुसावळात जोरदार पाऊस
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भुसावळ शहर व परीसरात शनिवारी 1 जुलै रोजी पावसाने जोरदार हजेली लावली. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले. दुपारी तीन वाजेनंतर शहरात जोरदार पाऊस झाला. शहरातील जामनेरोडवर सखल भागात पाणी साचले.गेल्या महिन्यात 7 जून आणि 9 जून नंतर पाऊसच झाला नसल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता.आजच्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे.