शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, पेरणीला येणार वेग
पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा संकटात सापडला होता. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले होते. कमी पावसामुळे पेरणीचे प्रमाणही अत्यल्प होते. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना पेरणीला वेग तसेच पेरणी झालेल्या पिकांसाठी पावसाला लाभदायी असल्याचे शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे.
पाऊस येताच तास वीज गूल, झाली नित्याची बाब
शहरात हलकासा वारा- पाऊस जरी आला तरी वीजपुरवठा खंडित केला जातो ही बाब आता नित्याचीच झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आधीच कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला असून, त्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिक पूर्णत: वैतागले आहेत. याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही दिसून येत आहे. विद्युत वितरण कंपनीने यापुढे तरी पाऊस वारा येण्याचे गृहीत धरून आधीच नियोजन करणे गरजेचे आहे.