जळगाव - जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, गुरुवारी रात्री जिल्ह्यातील अमळनेर, भडगाव व पारोळा या तीन तालुक्यांमध्ये अतीवृष्टीची नोंद झाली आहे. पारोळा तालुक्यात एकाच रात्री तब्बल ८३ मिमी पाऊस झाला आहे. यासह भडगाव तालुक्यात ७५ तर अमळनेर तालुक्यात ६५ मिमी पाऊस झाला आहे. पाचोरा व एरंडोल तालुक्यात देखील जोरदार पावसाने धूऊन काढले आहे.
जिल्ह्यात एकाच रात्री एकूण ३६ मिमी पाऊस झाला आहे. बुधवारी जिल्ह्यात १३ मिमी पाऊस झाला होता. ६ व ७ सप्टेंबर या दोन दिवसात जिल्ह्यात ४९ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पावसाच्या सरासरीत ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात ७ सप्टेंबरपर्यंत एकूण ६२ टक्के पाऊस झाला आहे. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी चिंता मिटल्या असून, ज्या पावसाची गरज शेतकऱ्यांना होती तो पाऊस झाल्यामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
ऑगस्ट महिन्याचा पाऊस केवळ दोन दिवसातजिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात एकूण ४८ मिमी पाऊस झाला होता. तर सप्टेंबर महिन्यात ६ व ७ सप्टेंबर रोजी एकूण ४९ मिमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात जेवढा पाऊस जिल्ह्यात झाला होता. तेवढा पाऊस सप्टेंबर महिन्याच्या दोन दिवसात झाला आहे. विशेष म्हणजे अमळनेर, धरणगाव, चाळीसगाव, जामनेर या तालुक्यांमध्ये पावसाची मोठी तुट होती. दोन दिवसात झालेल्या पावसामुळे या तालुक्यांमधील पावसाची तूट बऱ्यापैकी भरून निघाली आहे.
या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंदअमळनेर - ६५.७ मिमीपारोळा - ८३ मिमीभडगाव - ७५.२ मिमी
या तालुक्यांमध्येही जोरदारएरंडोल - ५०.४ मिमीपाचोरा - ६२.२ मिमी
तालुकानिहाय झालेला पाऊसजळगाव - ६.८ मिमीभुसावळ - २५ मिमीयावल - ५.२ मिमीरावेर - २६ मिमीमुक्ताईनगर - २० मिमीचोपडा - २३ मिमीचाळीसगाव - २५ मिमीजामनेर - २३ मिमीधरणगाव - ३२ मिमीबोदवड - १४ मिमी