फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : गणेशोत्सव व दुर्गोत्सव साजरे करताना मूर्तीच्या उंचीची मर्यादा असली पाहिजे. याचे भान आपण मंडळातील पदाधिकाऱ्यांनी ठेवले पाहिजे. आपण समाजात वावरत असतो आणि आपणच देवतांची विटंबना करतो. यासारखे आपले दुर्दैव कोणते नाही, असे उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी शांतता कमिटीमध्ये झालेल्या बैठकीत सांगितले.गणेशोत्सव, दुर्गाेत्सव व येणारे सण यासंदर्भात शनिवारी फैजपूर पोलीस स्टेशनला शांतता कमिटी व मंडळाचे पदाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी तहसीलदार जितेंद्र कुवर, एपीआय प्रकाश वानखडे, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, माजी नगराध्यक्ष नीलेश राणे, नगरसेवक शेख कुर्बान, डॉ.जलील, पालिका आरोग्य निरीक्षक सुमित साळुंखे, रवींद्र होले यांच्यासह गणपती मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.डीवायएसपी पिंगळे यांनी सांगितले की, मूतीर्ची उंची ही पाच फुटांपर्यंत असली पाहिजे. त्यापेक्षा मोठी उंची आणू नये. मोठ्या मूर्तींचे विसर्जन करताना त्या मूर्तींची विटंबना आपणच करतो. नदीतील पाणी कमी झाल्याने त्या मोठ्या मूर्तींचे व्यवस्थित विसर्जन न झाल्याने त्याच अवस्थेत राहतात आणि प्रदूषण तयार होते. त्यामुळे मूर्तीची स्थापना करताना पर्यावरण पूरकच असली पाहिजे.बॅण्डच्या आवाजाची मर्यादा तपासली जाईल.गणेशोत्सव व दुर्गाेत्सव यामध्ये जास्त जास्त आवाजाचे बँड आणले जातात आणि ते आवाज जास्त कर्कश असल्याने त्याचा परिणाम आपल्या हृदयावर होतो. बँडचे जास्त आवाज असल्यास त्या बँड पथकावर मिरवणूक संपल्यावर पोलीस स्टेशनला जमा करून गुन्हे दाखल केले जातील.मिरवणुकीत शिस्तभंग करणाऱ्यांवर होणार कारवाईगणेशोत्सव साजरे करताना शिस्त पाळणे महत्वाचे आहे. हा उत्सव १८ ते २५ वयोगटातील तरुण मुले मोठ्या प्रमाणावर साजरे करतात. महाविद्यालय व शाळेतील मुलांचे भांडण या उत्सवा दरम्यान जुन्या भांडणावरून हाणामारी होते. असे कोणी टवाळखोर असल्यास त्यांना दुसºया दिवशी पोलीस हिसका दाखवून गुन्हे दाखल केले जातील. यामुळे आपले कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून आपण खबरदारी घेतली पाहिजे.यावेळी तहसीलदार जितेंद्र कुवर, एपीआय प्रकाश वानखडे, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे यांनी मार्गदर्शन केले.गणेशोत्सव कार्यकर्त्याच्या ज्या सूचना होत्या त्या येत्या तीन दिवसात सोडवल्या जातील. सूत्रसंचालन माजी नगरसेवक केतन किरंगे यांनी केले तर आभार एपीआय प्रकाश वानखडे यांनी मानले.
उत्सव साजरे करताना मूर्र्तींच्या उंचीची मर्यादा असावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 4:31 PM
गणेशोत्सव व दुर्गोत्सव साजरे करताना मूर्तीच्या उंचीची मर्यादा असली पाहिजे. याचे भान आपण मंडळातील पदाधिकाऱ्यांनी ठेवले पाहिजे.
ठळक मुद्देफैजपूर डीवाय. एस.पी. नरेंद्र पिंगळेशांतता समितीच्या बैठकीत सदस्यांनी केल्या काही सूचना