आॅनलाईन लोकमतजळगाव दि १७, : स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून काढलेले २० लाख रुपये कारमध्ये ठेवत असताना मागून आलेल्या एका चोरट्याने साहेब, तुम्हाला बॅँकेच्या साहेबांनी बोलावले असे सांगून ही रक्कम लांबविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी १.४५ ते २ या वेळेत स्टेट बॅँकेच्या मुख्य शाखेजवळ घडली. यावेळीच दुसºया चोरट्याने कार चालकाच्या दिशेने १० रुपयांच्या १४ नोटा जमिनीवर टाकून तुमचे पैसे पडले म्हणत चालकाचे लक्ष विचलित केले. अवघ्या दहा मिनिटात चोरट्यांनी कार मालक व चालक यांची दिशाभूल करुन ही रक्कम लांबविल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली.
सत्रासेन आश्रमशाळेसाठी पैसे काढले बँकेतूनयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,धनाजी नाना चौधरी आदिवासी मंडळ संचलित सत्रासेन आश्रमशाळेच्या (ता.चोपडा) कामासाठी पैसे लागणार असल्याने संस्थेचे संचालक रवींद्र रायसिंग भादले (वय ३६ रा.सत्रासेन, ता.चोपडा, ह.मु.मधुबन अपार्टमेंट, पिंप्राळा रोड, जळगाव) व त्यांचा चालक गणेश रामदास कोळी (वय ३५ रा.खामखेडा, ता.शिरपूर) असे दोघं जण मंगळवारी दहा वाजता कारने (क्र.एम.एच.१९ ए.पी.६८७०) जळगाव यायला निघाले. दुपारी एक वाजता स्टेट बॅँकेच्या मुख्य शाखेत आले. शाखेच्या बाहेरच रस्त्याने कार लावल्यानंतर रवींद्र भादले यांनी कारमधील वातानुकूलीत यंत्रणा (ए.सी.)सुरु ठेवण्यासाठी चालकाला कार बंद न करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे चालकाने कार सुरुच ठेवली होती व तो कारमध्येच बसला.
कारचा दरवाजा ‘लॉक’ न करणे पडले महागातदुपारी १.४५ वाजता रवींद्र भादले हे बँकेतून दोन बॅगांमध्ये २० लाख रुपये घेऊन आले. कारच्या मागील बाजूस सीटच्या खाली त्यांनी दोन्ही बॅगा ठेवल्या. तितक्यात एक जण मागून आला व भादले यांना साहेब, तुम्हाला बॅँकेच्या साहेबांनी लवकर बोलावले असे सांगून या बॅगा लांबविल्या.